
मुंबई : बाॅलिवूड चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यास गेल्या काही दिवसांपासून यश मिळत नाहीये. सातत्याने बाॅलिवूडटचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. चित्रपटाचे बजेट काढणे देखील अवघड होऊन बसल्याने यावर अनेकांनी चिंता व्यक्त केलीये. इतकेच नाही तर यावर अनेकजण जाहिर बोलत आहेत. बाॅलिवूड चित्रपटांचे हे हाल सुरू असतानाच साऊथचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहेत. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या ऊंचाई या चित्रपटाच्या रिलीजनंतर बाॅलिवूडला थोडासा दिलासा नक्कीच मिळालाय.
अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा ऊंचाई हा चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगले बाॅक्स ऑफिसवर कलेक्शन केले. शनिवार देखील चित्रपटासाठी लक्की ठरल्याचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनवरून दिसत आहे, विकेंडचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. हा चित्रपट संपूर्ण देशभरात 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालाय. दिलासादायक बाब म्हणजे बाॅलिवूडच्या इतर चित्रपटांप्रमाणे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली नाहीये.
ऊंचाई चित्रपटाची स्टोरी ही चार मित्रांवर आधारित आहे. विशेष म्हणजे निवृत्तीच्या वयातही हे सर्व आपले स्वप्न पूर्ण करत माऊंट एव्हरेस्ट सर करतात. परिणीती चोप्रा देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. ऊंचाई चित्रपटाचे शनिवारचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले असून 3 कोटी 30 लाखांचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकत नाहीयेत. मात्र, जे आमिर खान आणि अक्षय कुमारला जमले नाही ते अमिताभ बच्चन यांनी करून दाखवले.