‘करण जोहर’च्या रॉकी और रानी चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर मुख्य भूमिकेत, पोस्ट शेअर करत म्हटले की…
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण जोहरने या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केलीये.

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरचा बहुचर्चित चित्रपट रॉकी और रानीची रिलीज डेट जाहिर करण्यात आलीये. या चित्रपटाकडून करण जोहरला प्रचंड अपेक्षा आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण जोहरने या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केलीये. इतकेच नव्हे तर रिलीज डेट जाहिर करण्यासोबतच भली मोठी पोस्टही करणने लिहिली आहे. या चित्रपटात करण जोहरची अत्यंत आवडती आणि जवळची अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिंह देखील या चित्रपटात धमाका करताना दिसणार आहे.
रॉकी और रानी हा चित्रपट आपण आपल्या कुटुंबासोबत पाहू शकता. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने त्याच्या ट्विटर हँडलवर रॉकी और रानीची रिलीज डेट जाहीर करणारी पोस्ट शेअर केली आहे. रॉकी और रानीच्या नवीन रिलीज डेट सोबत करण जोहरने एक पोस्टरही शेअर केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, 7 वर्षांनंतर त्याच्या पुनरागमनाबद्दल तो खूप उत्साहित आहे.
करण जोहर हा नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुला- मुलींना सतत लाॅन्च करत असल्याने करण नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान, अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, मलायका अरोराचा मुलगा अरहान खान यांना लवकरच करण जोहर लाॅन्च करणार आहे. अनन्या पांडे आणि आलिया भट्टला देखील करण जोहरनेच बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले होते.
