Shehzada Teaser | कार्तिक आर्यन याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी दिले मोठे गिफ्ट

| Updated on: Nov 22, 2022 | 6:04 PM

या चित्रपटात कार्तिक एका हटके भूमिकेत असणार असल्याची चर्चा सातत्याने रंगत होती.

Shehzada Teaser | कार्तिक आर्यन याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी दिले मोठे गिफ्ट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटात कार्तिक एका हटके भूमिकेत असणार असल्याची चर्चा सातत्याने रंगत होती. कार्तिक आर्यन सतत हीट चित्रपट देत असल्याने कार्तिकला चित्रपटांच्या आॅफर येत आहेत. नुकताच शहजादा या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. आज कार्तिकचा वाढदिवस असून या दिवसाला खास बनवण्यासाठी कार्तिकने आपल्या चाहत्यांना चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करत मोठे गिफ्ट दिले आहे.

शहजादा या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये कार्तिक आर्यन जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. 58 शेकंदांच्या या फर्स्ट लूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कार्तिकच्या चाहत्यांना देखील त्याचा हा लूक आवडला आहे.

व्हिडिओची सुरुवात एका आलिशान राजवाड्याने होते आणि ज्यामध्ये कार्तिक घोड्यावर बसून प्रवेश करतो. यादरम्यान कार्तिक म्हणतो की, जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही चर्चा करत नाहीत, मग थेट कृती करतो… यानंतर कार्तिक जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय.

या फर्स्टलूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढताना दिसत आहे. कार्तिक आर्यनचा हा टीजर व्हिडीओ पाहून चाहते काैतुक करताना दिसत आहेत, काहींनी यावर टीका केली असून अल्लू अर्जुनची काॅपी कार्तिक करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाच्या टीझरसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आलीये. 2023 मध्ये शहजादा 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री क्रिती सेननही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.