पॉर्नोग्राफी प्रकरणातील चार्जशीटमध्ये राज कुंद्राचे नाव, वकिलाने केली सावरासावर?

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे पाय खोलात असल्याचे सुरूवातीपासून दिसत आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणातील चार्जशीटमध्ये राज कुंद्राचे नाव, वकिलाने केली सावरासावर?
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 4:56 PM

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे पाय खोलात असल्याचे सुरूवातीपासून दिसत आहे. मला फसवले जात असल्याचे सांगत राज कुंद्राने अनेक आरोप काही दिवसांपूर्वी केले होते. आता या सर्व प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी चार्जशीट दाखल केलीये. या प्रकरणात फक्त शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच नाही तर पूनम पांडे, मीता झुनझुनवाला, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्याविरोधात पॉर्नोग्राफी प्रकरणात महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रासह मीता झुनझुनवाला, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा यांच्यावर अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप केला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे नाव पुढे येत आहे.

इतकेच नाही तर या प्रकरणात काही दिवस राज कुंद्राला जेलमध्ये देखील जावे लागले होते. महाराष्ट्र पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात चार्जशीट दाखल केलीये आणि त्यामध्ये राज कुंद्राचे नाव आहे. मात्र, या सर्व प्रकरणात आता राज कुंद्राच्या वकिलांनी मोठे विधान केले असून, प्रशांत पाटील म्हणाले की, राज कुंद्राचे या संदर्भात काही देणे घेणे नाहीये.

राज कुंद्राचे नाव चार्जशीटमध्ये आहे, हे आम्हाला मीडियाकडूनच कळत आहे. पुढे प्रशांत पाटील म्हणाले की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणार आहोत आणि कारवाईदरम्यान न्यायालयात हजर देखील राहणार आहोत. माझ्या क्लायंटचा (राज कुंद्राचा) पोर्नोग्राफीशी काहीही संबंध नाहीये, परंतू ते न्यायासाठी लढणार आहेत.

आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे अनुसरण करू आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. सायबर सेलच्या 450 पानी आरोपपत्रात 6 आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता, इतकेच नाही तर अनेकांनी शिल्पावर देखील टीका केली होती.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.