
Actress Divya Khossla : इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनला आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने स्वतःच्या नावापुढे लावलेलं नवऱ्याचं नाव हटवलं. ज्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. आता देखील अभिनेत्री घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आस्क मी एनीथिंग सेशन दरम्यान अभिनेत्री बॉलिवूड आणि घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे…
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आहे. दिव्या हिने इंडस्ट्रीतील श्रीमंत पुरुषांपैकी एक असलेल्या भूषण कुमार याच्यासोबत लग्न केलं… दरम्यान, त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील उधाण आलं होतं… आस्क मी एनीथिंग सेशन दरम्यान अभिनेत्रीने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
एक नेटकऱ्याने दिव्याला विचारलं, ‘बॉलिवूडमध्ये इतकी अस्वस्थ परिस्थिती असूनही मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतेस?’ यावर दिव्या म्हणाली, ‘मला असं वाटतं की, बॉलिवूड एक अशी जागा आहे, जेथे तुमच्या आजू-बाजूला अनेक मगरी आहेत…म्हणून मला वाटतं की आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. कामासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकावा लागत असेल तर, काम नाही मिळालं तरी काहीही हरकत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
एका नेटकऱ्याने विचारलं की, ‘कोणता सिनेमा करताना सर्वात जास्त आनंद आला?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सवी’ सिनेमाची शुटिंग करताना मला अधिक आनंद वाटला… कायम 10 डिग्रीमध्ये 42 दिवस शुटिंग केली… सिनेमाची प्रॉडक्शन टीम देखील चांगली होती… सावी सिनेमा करताना मला प्रचंड आनंद आला.
तुझा घटस्फोट झाला आहे का? असा प्रश्न देखील दिव्या हिला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, नाही… पण माझा घटस्फोट व्हावा असं अनेकांना वाटत आहे… दिव्या हिने 2005 मध्ये भूषण कुमार याच्यासोबत लग्न केलं. भूषण कुमार सिनेमा आणि संगीत निर्माता आहे…