“युद्धातलं राजकारण चित्रपटासारखं भासतंय”, रशिया- युक्रेन युद्धावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 25, 2022 | 2:25 PM

रशिया- युक्रेन युद्धावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जागतिक पातळीला जे युद्ध सुरू आहे. त्याभोवती जे राजकारण सुरू आहे ते सिनेमातील गोष्टीसारखं असल्याचं स्वरा भास्करने म्हटलंय.

युद्धातलं राजकारण चित्रपटासारखं भासतंय, रशिया- युक्रेन युद्धावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
स्वरा भास्कर
Follow us on

आयेशा सय्यद, मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाची सरशी होताना दिसून येत आहे. रशियाने आक्रमण करत युक्रेनच्या चेरनोबिल आणु प्रकल्पावर कब्जा मिळवल्याचे वृत्त समोर येत आहे. या वृत्ताला युक्रेनच्या पंतप्रधानांनी देखील दुजोरा दिला आहे. यात जागतिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अश्यात आता रशिया- युक्रेन युद्धावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जागतिक पातळीला जे युद्ध सुरू आहे. त्याभोवती जे राजकारण सुरू आहे ते सिनेमातील गोष्टीसारखं असल्याचं स्वरा भास्करने म्हटलंय. तसंच अभिनेता सोनू सूदनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा भास्करचं ट्विट

रशिया- युक्रेन युद्धावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. ट्विवरच्या माध्यमातून तिने आपलं मत मांडलं आहे. यात तिने युनायटेड नेशनचं ट्विट रिट्विट केल आहे. “सध्या जागतिक पातळीला जे युद्ध सुरू आहे. त्याभोवती जे राजकारण सुरू आहे ते सिनेमातील गोष्टीसारखं वाटत आहे”, असं स्वरा भास्करने म्हटलंय.

सोनू सूदची प्रतिक्रिया

अभिनेता सोनू सूदनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “युक्रेनमध्ये 18 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. मला खात्री आहे की त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. भारतीय दुतावासाला माझी विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणावं. या अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो”, असं सोनू सूद म्हणाला आहे.

शशी थरूर यांचं ट्विट

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी युक्रेन -रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केले आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये युक्रेनियन ध्वज पाठिवर घेतलेल्या पुरुषाने रशियन ध्वज असलेल्या महिलेला अलिंगन दिले आहे. “युद्ध आणि संघर्षावर प्रेमाचा विजय होईल अशी आशा करुया”, असं शशी थरूर म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

Chakda Xpress: अनुष्का शर्माने नेटमध्ये करतेय मेहनत, सुरु केला गोलंदाजीचा सराव

‘पाँडीचेरी’ चित्रपट प्रदर्शित, स्मार्टफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा

Devmanus: ‘देवमाणूस’ मालिकेत विलक्षण वळण; लोकांच्या जीवाशी खेळणारा बनणार दुसऱ्याच्या हातातलं खेळणं