आमिर खान थूक जिहादी, महिलांवर… दिग्दर्शकाकडून अभिनेत्याची पोलखोल… सर्वत्र खळबळ

Aamir Khan : आमिर खान चलाक लोमडी, थूक जिहादी, महिलांवर..., प्रसिद्ध दिग्दर्शकाना साधला आमिरवर निशाणा, अभिनेत्याची केली पोलखोल..., याआधी दिग्दर्शकाने अभिनेता सलमान खान याच्यावर देखील साधलाय निशाणा...

आमिर खान थूक जिहादी, महिलांवर... दिग्दर्शकाकडून अभिनेत्याची पोलखोल... सर्वत्र खळबळ
फाईल फोटो
| Updated on: Oct 25, 2025 | 11:49 AM

Aamir Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शत अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेता सनमान खान याच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर सलमान खान याने देखील ‘बिग बॉस 19’ च्या मंचावरुन दिग्दर्शकाला सुनावलं होतं. आता अभिनव याने अभिनेता आमिर खान याच्यावर निशाणा साधला असून त्याला चालाक लोमडी म्हणाला आहे… शिवाय लेखल सलीम खान लव्ह जिहादी तर, आमिर खान थूक जिहादी आहे.. असं देखील दिग्दर्शक म्हणाला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप खान अभिनेत्यांवर निशाणा साधत म्हणाला, आमिर खान मतपरिवर्तन करणारा आणि सर्वांना नियंत्रित ठेवणारा आहे… त्याची ओळख बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी असली तरी, त्याच्यासोबत काम करणं फार कठीण आहे. तो चलाक लोमडी आहे.

उंचीने तो सलमानपेक्षा लहान आहे. पण तो सर्वात धूर्त चोर आहे. मी आमिर खान याच्यासोबत 2 – 3 जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तो खूप पर्टिकुलर आहे आणि त्याच्यासोबत काम करणं थकवणारं आहे. तो प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतो… एडिटिंग, दिग्दर्शन… त्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत असतं. ही एक संपूर्ण परिसंस्था आहे, जी कडक नियंत्रणाखाली ठेवली जाते.

यासोबतच अभिनवने आमिरबद्दल असंही म्हटलं की, जर आमिरने 25 टेक दिले तर त्याचा पहिला आणि शेवटचा टेक बऱ्याचदा सारखाच असतो. एवढंच नाही तर, अभिनव याने राजकुमार हिराणी यांना देखील सल्ला दिलेला, ‘चांगल्या अभिनेत्यांसोबत काम करायला हवं… आमिर खान सारख्या अभिनेत्यांसोबत काम नाही केलं पाहजे… ‘

आमीर खान थूक जिहादी….

अभिनव पुढे म्हणाला, ‘तुम्ही थूक जिहादी ऐकलं असेल.. ज्या प्रकारे सलीम खान लव्ह जिहादी आहे आहेत, त्याच प्रमाणे अमिर खान थूक जिहादी आहे… कधी जुही चावला तर, कधी ममता कुलकर्णी सर्वांच्या हतावर थूंकत असतो… 21 व्या दशकात थूंकून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. थुंकी तोंडातच ठेव… ज्यामळे पचन क्रिया चांगली राहील.. नाहीतर महिलांवर थुंकून तुम्ही खूप तापट होत आहात. हे सर्व जिहादी मानसिकतेचे लोक आहेत…’ सध्या सर्वत्र अभिवन यांने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.