TMKOC फेम अभिनेत्याचं आयुष्यात सर्वांत मोठं दुःख, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘परत कधीच…’
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेल अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेता सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला, 'आता पुन्हा कधीच...', सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत ‘बाघा’ ही भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया (Actor Tanmay Vekaria) याच्या आईचं निधन झालं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तन्मय याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे आईसोबत काही खास क्षण आहेत. सध्या तन्मय याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
या रीलसाठी, तन्मयने बॅकग्राउंड ‘दुश्मन’ सिनेमातील ‘चिठी ना कोई संदेश’ हे हृदयद्रावक गाणं लावलं आहे, ज्यामुळे पोस्ट आणखी भावनिक झाली. व्हिडीओ पोस्ट करत तन्मय कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘हे दुर्दैव आहे की, तुम्ही आता फक्त तिला फोटोंमध्ये पाहू शकतो आणि मनात तिची उपस्थिती जाणवू शकतो, आता परत कधीच तिला मिठी मारू शकत नाही… किंवा तिला समोरासमोर पाहू शकत नाही… मिस यू माई… तुझी आठवण कायम येईल… मला खात्री आहे की, तू आता स्वर्गात सर्वोत्तम आणि सुखाच्या ठिकाणी असशील…’
तन्मय याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तन्मयच्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या पोस्टनंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याला धीर देत आहेत.
View this post on Instagram
तन्मय वेकारिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर टीव्ही सोबतच अभिनेता गुजराती सिनेविश्वात देखील सक्रिय आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेत त्याने अनेक छोट्या – मोठ्या भूमिका साकरल्या आहेत. शिक्षत, रिक्षा चालक, मोलकरणीचा पती, टॅक्सी ड्रायव्हर… त्यानंतर तन्मय याने साकारलेल्या ‘बाघा’ या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मध्यंतरी मालिकेत अनेक बदल झाले. पण मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही… आजही मालिका प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात…
