AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गादेवीच्या मांडवात लोकांनी केलेल्या त्या कृत्यावर काजोल भडकली, माईक हातात घेऊन झाप झाप झापले…

Kajol gets angry: बाजूला व्हा. तुम्ही शूज घातले आहे. कृपया या ठिकाणी शूज घालू नका. ज्यांनी शूज घातले आहे, त्यांनी दुसऱ्या बाजूला जावे. ही एक पूजा आहे. आपण सर्वांनी तिचा सन्मान ठेवला पाहिजे.

दुर्गादेवीच्या मांडवात लोकांनी केलेल्या त्या कृत्यावर काजोल भडकली, माईक हातात घेऊन झाप झाप झापले...
काजोल संतापली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 12, 2024 | 4:39 PM
Share

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा केला गेला. अनेक ठिकाणी दांडिया अन् गरबा रास रंगला. मुंबईत अनेक ठिकाणी दुर्गा पूजाचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना बॉलीवूडमधील स्टार आले होते. बॉलीवूड अभिनेत्री काजोल दुर्गा पूजेच्या कार्यक्रमांना गेली. परिवारातील सदस्यासह काजोल सांताक्रूजमधील नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पूजामध्ये आली होती. त्या ठिकाणचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काजोल चांगलीच भडकलेली दिसत आहे. काजोलच्या संताप करण्याचे कारण काय होते…

मुंबईतील आहे तो व्हिडिओ…

सांताक्रूझमधील नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गापूजेचे काजोलचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री काजोलने दुर्गा पूजा पंडालमध्ये चपला, शूज घालून प्रवेश करणाऱ्यांवर काजोल संतापली आहे. तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शूज घालून देवीच्या जवळ येणाऱ्या लोकांचा तिने विरोध केला आहे. पवित्र ठिकाणी शिष्टाचार पाळण्याचे ती सांगत आहे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये कोणातरीकडे इशारा करत अभिनेत्री काजोल संतापलेली दिसत आहे. ती म्हणते, बाजूला व्हा. तुम्ही शूज घातले आहे. कृपया या ठिकाणी शूज घालू नका. ज्यांनी शूज घातले आहे, त्यांनी दुसऱ्या बाजूला जावे. ही एक पूजा आहे. आपण सर्वांनी तिचा सन्मान ठेवला पाहिजे. मागे उभ्या असलेल्या लोकांशी बोलताना काजोल म्हणते, कृपया बॅरिकेडवरुन येऊ नका. त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. जेव्हा काजोल लोकांना अपील करत होती, तेव्हा तिची बहीण तनीषा मुखर्जी आणि अभिनेत्री आलिया भट्ट तिच्याजवळ होती.

सोशल मीडियावर काजोलच्या या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. हजारो जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काजोलचे कौतूक केले आहे. धार्मिक ठिकाणी पावित्र्य जपले पाहिजे, असे सर्वच युजरने म्हटले आहे. एका युजरने तर काजोलचा उल्लेख लेडी सिंघम केला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा