AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf: शूटिंगच्या 4 दिवस आधी अशोक सराफ ICU मध्ये होते, तरी..; संकर्षण कऱ्हाडेचा खुलासा

Ashok Saraf: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एका कार्यक्रमामध्ये अशोक सराफ हे चित्रपटाचे शूट सुरु होण्यापूर्वी 4 दिवस आधी आयसीयूमध्ये असल्याचे सांगितले आहे. त्यांना नेमकं काय झालं होतं? वाचा...

Ashok Saraf: शूटिंगच्या 4 दिवस आधी अशोक सराफ ICU मध्ये होते, तरी..; संकर्षण कऱ्हाडेचा खुलासा
Ashok sarafImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 1:45 PM
Share

आजोबा आणि नातवाच्या नात्यातील धमाल, मस्ती आणि भावनिक क्षण उलगडणारा ‘आदि अनंत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे ही अनोखी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेने एका कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यासोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिला. त्यातील एका गंमतीशीर प्रसंगातून अशोक सराफ यांचा मिश्कील स्वभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. तर दुसरीकडे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त समोर आली आहे.

अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त. संकर्षण कऱ्हाडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, आजही अशोक सराफ ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी सेटवर हजर असतात. आपल्या कामाबद्दलची ही बांधिलकी नव्या पिढीतील कलाकारांसाठी नक्कीच शिकण्यासारखी आहे.

शूटला 4 दिवस बाकी असताना ICUमध्ये

विशेष म्हणजे, ‘आदि अनंत’च्या चित्रीकरणाला अवघे चार दिवस बाकी असताना अशोक सराफ यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ठरलेल्या दिवशी ते चित्रीकरणासाठी सेटवर हजर झाले. या काळात निवेदिता सराफ यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. त्या स्वतः सेटवर येऊन सर्व गोष्टींची पाहणी करून गेल्या आणि दिग्दर्शक महेश लिमये यांना आवश्यक त्या सूचना देऊन गेल्या.

अशोक सराफ यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांची विनोदबुद्धी, कामातील शिस्त आणि आपल्या जबाबदारीप्रती असलेली निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू आहेत. ‘आदि अनंत’ या चित्रपटाच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने सांगितलेला हा किस्सा अशोक सराफ यांच्यातील कलाकारासोबतच माणूस म्हणून असलेली त्यांची सहजता आणि मिश्कील वृत्तीही उलगडतात. त्यामुळे पडद्यावर या दोघांची आजोबा-नातवाची जोडी पाहाण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?