
Chava Movie Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांचे अनोखे चरित्र विकी कौशल यांचा छावा चित्रपटामुळे जगभरातसमोर आले आहे. देशातील शालेय अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास शिकवला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे भारताचा क्रिकेट खेळाडू नीरज चोपडा संतप्त झाला. छावा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न विचारत त्याने कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना हात घातला. चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज यांचा इतिहास समजल्याचे सांगत नीरज चोपडा याने दिल्लीतील रस्त्याचे नाव औरंगजेब रोड का आहे? असा प्रश्न विचारला. दुसरी संतप्त प्रतिक्रिया गुजरातमधून आली. छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार पाहून गुजरातमधील जयेश वसावा संतप्त झाले. त्यांनी आपण हा चित्रपट पाहत असल्याचे विसरुन थेट सिनेमागृहाच्या पडद्यावर धाव घेतली. त्यांनी सिनेमागृहाचा पडदा फाडून टाकला. या घटना संभाजी महाराजांचे चरित्र सर्व देशवासियांपर्यंत पोहचले नाही, हे स्पष्टपणे दाखवणाऱ्या ठरला. देशात नाही महाराष्ट्रातील...