कमल किशोर मिश्राला अटक, हे प्रकरण भोवण्याची दाट शक्यता

हे संपूर्ण प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेले आहे. अंधेरी येथे ही घटना घडलीये. यामुळे आता कमल किशोर मिश्रा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

कमल किशोर मिश्राला अटक, हे प्रकरण भोवण्याची दाट शक्यता
| Updated on: Oct 28, 2022 | 11:48 AM

मुंबई : फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध असलेले नाव कमल किशोर मिश्रा गेल्या काही तासांपासून प्रचंड चर्चेत आहेत. बायकोच्या अंगावर गाडी घालतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हे संपूर्ण प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेले आहे. अंधेरी येथे ही घटना घडलीये. पोलिसांनी गुन्हा याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून कमल किशोर मिश्रा यांना आता अटकही केलीये.

कमल किशोर मिश्रा यांनी पत्नी यास्मीन हिच्या अंगावर गाडी घालत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पोलिसांनी कमल किशोर मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कमल मिश्रा यांना चाैकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. मात्र, चाैकशीनंतर पोलिसांनी कमल किशोर मिश्राला अटक केल्याची माहिती मिळतंय.

कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नी यास्मीनच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी कमल किशोर मिश्राविरुद्ध भादंवि कलम 279 आणि 338 नुसार गुन्हा दाखल केला. गाडी अंगावर घातल्याने कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीला दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला गंभीर लागल्याचे देखील कळते आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कमल किशोर मिश्रा बोलण्यासाठी गाडीजवळ आलेल्या पत्नीच्या अंगावर गाडी घालत आहेत. यावेळी गाडी रोखण्यासाठी यास्मीन खूप प्रयत्न करते. गाडीमध्ये कमल किशोर मिश्रासोबत त्याची प्रियसी असल्याने त्याने गाडी थांबवली नाही, असे सांगितले जातंय.