“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान

सुनीताने पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्य पार पाडत गोविंदाला साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुनीताने 'हिंदुस्तान टाईम्स'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने गोविंदाच्या अफेअर्ससोबत इतर गोष्टींवरही भाष्य केले.

या वयात लोकांचं डोकं फिरतं... गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
Govinda sunita ahuja divorce rumours
| Updated on: Feb 25, 2025 | 9:14 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता या दोघांही विविध कारणांनी प्रसिद्धीझोतात असतात. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान त्याची पत्नी सुनीताने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने गोविंदाच्या अफेअर्सबद्दल भाष्य केले होते.

सुनीताशी लग्न करण्यापूर्वी गोविंदाचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. पण त्याने कधीही यावर भाष्य केलेले नाही. गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह 11 मार्च 1987 रोजी झाला. त्यांच्या लग्नाला 37 वर्ष झाली आहे. सुनीताने पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्य पार पाडत गोविंदाला साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुनीताने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने गोविंदाच्या अफेअर्ससोबत इतर गोष्टींवरही भाष्य केले.

सुनीता मुलाखतीदरम्यान नेमकं काय म्हणाली?

गोविंदाच्या लग्नाआधी किंवा लग्नानंतर जेव्हा एखाद्या मुलीशी लिंकअपच्या बातम्या यायच्या तेव्हा तुम्हाला काय वाटायचे, असा प्रश्न सुनीताला विचारण्यात आला. त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिले. “जेव्हा गोविंदाच्या लिंक-अपच्या बातम्या यायच्या तेव्हा मला माझ्या मनावर दगड ठेवावा लागायचा. गोविंदाचे नाव नेहमी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जोडलं जायचं. पण त्यावेळी तो अभिनयात त्याच्या कामात व्यस्त होता. त्याच्या चित्रपटाचे सलग शूटींग असायचे. तो तरुण असताना इतका कामात असायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता.” असे सुनीताने म्हटले.

पण आता तो 60 वर्षांचा आहे. अभिनयापासून दूर आहे. आता मला भीती वाटते की त्याच्याकडे खूप रिकामा वेळ आहे, त्यामुळे त्याने लिंक-अप किंवा तसं काही करायला नको. कारण या वयात लोकांचे मन विचलित होते” असेही सुनीता म्हणाले. तिच्या या विधानानतंर सुनीताने तिच्या मनातील खदखद व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

गोविंदा मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा

दरम्यान गोविंदाचे लग्न झाले तेव्हा सुनीता फक्त १८ वर्षांच्या होत्या. तर गोविंदा हा २४ वर्षांचा होता. गोविंदाने त्याचवेळी आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर, आता ते विभक्त होणार असल्याचे बोललं जात आहे. गोविंदा एका ३६ वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र, यात किती तथ्य आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.