Happy Birthday Daler Mehndi | पंजाबी किंग दलेर मेहंदीची सुपर हिट गाणी, ऐकून तुमचेही पाय थिरकतील…

दलेरने अमिताभ बच्चन आणि आमिर खान सारख्या स्टार्ससाठीही आपला आवाज दिला आहे. दलेर मेहंदी केवळ एक उत्तम गायक नाही, तर एक संगीतकार, गीतकार, लेखक, रेकॉर्ड निर्माता आणि कलाकार देखील आहे.

Happy Birthday Daler Mehndi | पंजाबी किंग दलेर मेहंदीची सुपर हिट गाणी, ऐकून तुमचेही पाय थिरकतील...
दलेर मेहंदी
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 11:19 AM

मुंबई : असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा जन्म तोंडात चांदीचा चमचा घेऊनच झाला आहे. त्याच वेळी, असे काही लोक आहेत ज्यांनी खूप संघर्षानंतर स्वतःसाठी एक खास स्थान बनवले आहे आणि त्यापैकी एक आहे दलेर मेहंदी (Daler Mehndi). दलेरचा जन्म बिहारमध्ये झाला. त्यावेळी कोणीही विचार केला नसेल की, हा मुलगा एक दिवस मोठा स्टार बनेल आणि अनेकांची मने जिंकेल. एवढेच नाही तर दलेरने अमिताभ बच्चन आणि आमिर खान सारख्या स्टार्ससाठीही आपला आवाज दिला आहे. दलेर मेहंदी केवळ एक उत्तम गायक नाही, तर एक संगीतकार, गीतकार, लेखक, रेकॉर्ड निर्माता आणि कलाकार देखील आहे.

दलेर मेहंदीची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दलेरला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचे शिक्षक स्वतः त्यांचे पालकच होते. वयाच्या 11व्या वर्षी दलेर उस्ताद राहत अली खान यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी घरातून पळून गेले होते. त्यांनी संगीत उस्तादांकडून 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्याकडून संगीताचे पूर्ण ज्ञान घेतले.

ऐका दलेर मेहंदी यांची सुपरहिट गाणी

हो जाएगी बल्ले-बल्ले

तुनक तुनक तुन

बोलो ता रा रा

सजन मेरा सतरंगिया

ना ना ना रे

 हेही वाचा :

‘स्पायडरमॅन’ बनून राखी सावंतला करायचीय ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री, ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचं डोकंही चक्रावेल!

पंजाबी क्वीन इहाना ढिल्लोंचा वाढदिवस, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे