Happy Birthday Genelia : माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, रितेश देशमुखने खरं नाव सांगितलं!

| Updated on: Aug 05, 2021 | 3:55 PM

आता जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखनं खास गोष्ट चाहत्यांना सांंगितली आहे. रितेश देशमुखनं बायकोचं खरं नाव सांगितलं! (Happy Birthday Genelia D'Souza : Riteish Deshmukh's special post about Genelia's name)

Happy Birthday Genelia : माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, रितेश देशमुखने खरं नाव सांगितलं!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची मोहक आणि बबली अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखसाठी (Genelia D’Souza) आजचा दिवस (5 ऑगस्ट) खूप खास आहे. आज जिनिलियाचा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत जिनिलिया डिसूझाचा विवाह झाला आहे. दोघं बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही…

आता जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखनं खास गोष्ट चाहत्यांना सांंगितली आहे. गेले अनेक वर्षे आपण ‘जेनेलिया’ या नावानं रितेशच्या बायकोला ओळखतो मात्र आता रितेशनं एक ट्विट करत ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ असं सांगितलं आहे. त्यानं आज म्हणजेच जिनिलियाच्या वाढदिवशी हे ट्विट केलं आहे.

पाहा रितेशचं ट्विट

रितेशनं जिनिलियाला दिल्या खास शुभेच्छा 

आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होतोय. असं असताना स्वत: रितेशनं एक सुंदर व्हिडीओ शेअर करत लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’ असं हटके कॅप्शन देत रितेशनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंडिग व्हिडीओ तयार करणाऱ्या या कपलचे काही खास व्हिडीओ यात आहेत.

पाहा व्हिडीओ

जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते. तिनं प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत ‘पार्कर पेन’च्या जाहिरातीत झळकली होती. या जाहिरातीत तिला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेशने जिनिलियाला प्रेमात पाडलंच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न केले. ‘जाने तू या जाने ना’ हा जिनिलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने ‘अदिती’ची भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

Happy Birthday Genelia D’Souza | जेनेलियाच्या क्युटनेसच्या प्रेमात पडला रितेश देशमुख, आधी दिला नकार मग जुळलं सूत!

Anushka Sharma : आ देखे जरा किसमे कितना है दम… अनुष्काची ही अमिताभ स्टाईल पाहिली का?