Happy Birthday Preeti Jhangiani | पाहिल्याच चित्रपटातून ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानीने मिळवली प्रसिद्धी, आता रमलीय सुखी संसारात!

प्रीती झांगियानीचा जन्म 18 ऑगस्ट 1980 रोजी झाला. तिने माझाविल्लू या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘मोहब्बतें’ होता. हा चित्रपट 2000 साली आला. या चित्रपटातील प्रीती झांगियानीचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले.

Happy Birthday Preeti Jhangiani | पाहिल्याच चित्रपटातून ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानीने मिळवली प्रसिद्धी, आता रमलीय सुखी संसारात!
प्रीती झांगियानी
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 8:17 AM

मुंबई : ‘मोहब्बतें’ (mohabbatein) फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी (preeti jhangiani ) आजही सर्वांच्या लक्षात आहे. तिच्या सौंदर्याने प्रीतीने सर्वांनाच स्वतःबद्दल वेड लावले. प्रीती झांगियानी हिने दक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. प्रीतीने बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.

प्रीती झांगियानीचा जन्म 18 ऑगस्ट 1980 रोजी झाला. तिने माझाविल्लू या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘मोहब्बतें’ होता. हा चित्रपट 2000 साली आला. या चित्रपटातील प्रीती झांगियानीचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. ‘मोहब्बतें’च्या यशानंतर प्रीती झांगियानीची प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा झाली, पण ती हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

प्रीतीच्या सौंदर्याची जादू!

90च्या दशकात प्रीती अभिनेता अब्बाससमवेत प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओ ‘चुई मुई सी तुम’ मध्ये दिसली होती. हा म्युझिक अल्बम खूप गाजला. प्रीतीच्या सौंदर्याची जादू आणि या अल्बममधील गाण्यांनी सर्वांनाच भुरळ घातली. या गाण्यानंतर अभिनेत्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

पुन्हा दक्षिणेकडे वळली!

‘मोहब्बतें’ चित्रपटानंतर प्रीती झांगियानी ‘अनर्थ’, ‘बाज’, ‘आवारा पागल दिवाना’ आणि ‘एलओसी कारगिल’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. परंतु, या सर्व चित्रपटांमध्ये तिला तिच्या पहिल्या चित्रपटासारखी प्रसिद्धी मिळू शकली नाही. बॉलिवूडमध्ये फारसे यश न मिळाल्यानंतर प्रीतीने झांगियानीमधून पुन्हा दक्षिण सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडनंतर प्रीती झांगियानी यांनी तमिळ, तेलगू, पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले. प्रीती झांगियानी हिचे दोन विवाह झाले आहेत. अभिनेत्रीने प्रथम चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांचे बंधू मुश्ताक खानसोबत लग्न झाले होते. काही कलानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर तिने मॉडेल आणि अभिनेता परवीन दाबाससोबत 2008 मध्ये लग्न केले.

संसारात रमली अभिनेत्री

लग्नानंतर आता या प्रीतीला दोन मुलगे आहेत आणि ती आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देत आहे. बरेच चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही अभिनेत्रीने जाहिराती, कार्यक्रम आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजूनही बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. ती म्हणाली, आता माझ्या अनुपस्थितीत अशी काही माणसे आहेत, जी माझी मुले जयवीर आणि देव यांची काळजी घेतात. अभिनेत्री प्रीती झांगियानी आता पूर्ण होम मेकर झाली आहे. ती सध्या वांद्रे येथे आपल्या कुटूंबासह राहते. प्रीती आता फिटनेस कॉन्शियस झाली आहे आणि ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

वयाच्या 40व्या वर्षीही प्रीती झांगियानी स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवते. मात्र, काळानुसार त्याच्या लूकमध्ये बरेच बदल होत आहेत. हा बदल त्याच्या जुन्या आणि नवीन चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसू शकतो. ती शेवटची 2017 राजस्थानी चित्रपट ‘तावडो द सनलाइट’मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

Super Dancer Chapter 4 : ‘बॅक ऑन सेट’, राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली!

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी