
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचे चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. मात्र, अजून थोडी वाट चाहत्यांना बघावी लागणार आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये हृतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशीच फायटर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिक रोशन याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
25th January 2024- see you at the theatres! #Fighter pic.twitter.com/ywdLeTmwnI
— Hrithik Roshan (@iHrithik) October 28, 2022
2021 मध्ये फायटर हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रिलीज होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, दीपिका आणि हृतिकला सोबत पाहण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 2023 ला रिलीज होणार नसून नुकताच चित्रपटाची नवीन रिलीज डेट पुढे आलीये. या चित्रपटाची रिलीज डेट ही दुसऱ्यांदा बदलण्यात आली आहे.
सिद्धार्थ आनंद याने आपली नवीन कंपनी Marflix Pictures स्थापन केली आहे. कंपनीचा पहिला अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ आहे. आता नवीन रिलीज डेटनुसार फायटर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी शुक्रवारी रिलीज होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे दोघेही भारतीय वायुसेनेचे पायलट म्हणून दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूर ही महत्वाच्या भूमिकेत आहेत.