Kareena Kapoor Khan: करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? बेबी बंपचा फोटो पाहून चाहते अवाक्!

करीनाच्या एका फॅन पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून करीना तिसऱ्यांदा गरोदर आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Kareena Kapoor Khan: करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? बेबी बंपचा फोटो पाहून चाहते अवाक्!
Kareena Kapoor Khan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 11:57 AM

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर, जेह या आपल्या दोन मुलांसोबत ती तिच्या ड्रिम व्हेकेशनवर असून त्याचे काही फोटोसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र या फॅमिली व्हेकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. करीनाचा हा फोटो पाहून चाहते थक्क झाले असून काहीजण तिला ट्रोलसुद्धा करत आहे. यामागचं कारण म्हणजे फोटोमध्ये दिसणारा करीनाचा बेबी बंप. सैफ आणि करीना एका मित्राला भेटले असून त्याच्यासोबतचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप (Pregnant) सहज पाहायला मिळत आहे. यावरून नेटकऱ्यांनी विविध अंदाज व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे.

करीनाच्या एका फॅन पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून करीना तिसऱ्यांदा गरोदर आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ‘असंच चालू राहिलं तर, काही वर्षांनी पतौडी क्रिकेट टीम तयार होईल’, असा उपरोधिक टोला एकाने लगावला. तर ‘करीना पुन्हा गरोदर आहे का’, असा प्रश्न अनेकांनी विचारला. ‘करीना खरंच गरोदर आहे आणि ती बेबी बंप लपवू शकत नाही’, असंही युजर्सनी म्हटलं आहे. करीनाचा हा फोटो जुना असू शकतो, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. एका युजरने तर फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये करीनाला टॅग करत ती गरोदर आहे का, असा प्रश्न विचारला आहे.

पहा व्हायरल फोटो-

करीनाने तिच्या लंडनमधल्या व्हेकेशनचे जेवढे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यात तिने पोट लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता करीना खरंच तिसऱ्यांदा गरोदर आहे की हा तिचा फोटो जुना आहे, याबद्दल तीच खुलासा करू शकेल. करीनाने ऑक्टोबर 2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. 2016 मध्ये तिने तैमुरला आणि 2021 मध्ये तिने जेहला जन्म दिला.