चित्रपटाच्या सेटवर जॅकलीन फर्नांडिस हिने चक्क रणवीर सिंह याच्या कानाखाली मारली, वाचा काय घडले होते?

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त होती.

चित्रपटाच्या सेटवर जॅकलीन फर्नांडिस हिने चक्क रणवीर सिंह याच्या कानाखाली मारली, वाचा काय घडले होते?
| Updated on: Dec 23, 2022 | 9:05 PM

मुंबई : रणवीर सिंहचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सर्कस हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटामध्ये काॅमेडीचा जबरदस्त तडका बघायला मिळतोय. कोरोनाच्यानंतर म्हणावे तेवढे काॅमेडी चित्रपट रिलीज झाले नसल्याने चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ आहे. काॅमेडी चित्रपट आणि तोही रोहित शेट्टीचा म्हटले की, बातच खास असते. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त होती. यादरम्यानच जॅकलीन फर्नांडिस हिने चित्रपटाच्या शूटींगच्या वेळीचा मोठा किस्सा सांगितला आहे.

नुकताच एका मुलाखतीवेळी जॅकलीन फर्नांडिस हिने मोठा खुलासा केला आणि सांगितले की, चित्रपटाच्या एका सीनवेळी तिच्याकडून किती मोठी चूक झाली होती. यावर रणवीर सिंहने देखील भाष्य केले आहे.

जॅकलीन फर्नांडिस म्हणाली, सर्कस चित्रपटामध्ये एक सीन होता. ज्यामध्ये मला रणवीर सिंह आणि वरुण धवन यांच्या कानाखाली मारायची होती. मात्र, हे सीन करताना मी खरोखरच विसरले की हा फक्त सीन आहे.

या सीनच्या वेळी मी इतकी जास्त नर्वस झाले होते की, मी खरोखरच त्यांना मारले. मला काहीच कळाले नाही. परंतू यादरम्यान मला वाटले की, मी बर्फच तोडला आहे. यावर रणवीर सिंह याने मजेदार पध्दतीने उत्तर दिले.

रणवीर सिंह म्हणाला की, हां….तू बर्फ नाहीतर जबडा तोडला होता…ज्याच्यासाठी मला बर्फ हवा होता. सर्कस चित्रपटाची ओपनिंग खास झाल्याचे सांगितले जात आहे.