JugJugg Jeeyo: फॅमिली ड्रामाचा फॉर्म्युला हिट; ‘जुग जुग जियो’ची 3 दिवसांत दणक्यात कमाई

| Updated on: Jun 27, 2022 | 10:35 AM

दिग्दर्शक राज मेहताने याआधी अक्षय कुमार, करीना कपूर खान यांच्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हासुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. राजच्या या दुसऱ्या चित्रपटालासुद्धा दमदार प्रतिसाद मिळतोय.

JugJugg Jeeyo: फॅमिली ड्रामाचा फॉर्म्युला हिट; जुग जुग जियोची 3 दिवसांत दणक्यात कमाई
JugJugg Jeeyo
Image Credit source: Instagram
Follow us on

अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) या फॅमिली ड्रामाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. वीकेंडला या चित्रपटाची कमाई (Box Office Collection) दणक्यात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने जवळपास 36 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये मनिष पॉल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळी यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ठिकठाक कमाई केली होती. मात्र वीकेंडला (weekend) कमाईच्या आकड्यात लक्षणीय वाढ झाली. शनिवारच्या कमाईत 34 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आणि रविवारी त्याहून अधिक कमाई झाली. रविवारी या चित्रपटाने 14.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दिग्दर्शक राज मेहताने याआधी अक्षय कुमार, करीना कपूर खान यांच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हासुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. राजच्या या दुसऱ्या चित्रपटालासुद्धा दमदार प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शनापूर्वी त्यातील गाण्यावरून वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानी गायक अब्रार-उल-हक याने ‘जुग जुग जियो’मधील ‘द पंजाबन’ हे गाणं त्याच्या गाण्यावरून कॉपी केल्याचा आरोप केला होता. मात्र प्रॉडक्शन हाऊसने त्या गाण्याचे हक्क आधीच विकत घेतले होते, असं वरुणने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

जुग जुग जियोची आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 9.28 कोटी रुपये
शनिवार- 12.55 कोटी रुपये
रविवार- 14.50 कोटी रुपये
एकूण- 36 कोटी रुपये

इन्स्टा पोस्ट-

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील गाणी सोशल मीडियावर हिट ठरली. पंजाबन, दुपट्टा आणि रंगसारी या गाण्यांवर इन्स्टाग्रामवर रिल व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले. आता माऊथ पब्लिसिटीचाही चित्रपटाच्या कमाईत फायदा होईल. आतापर्यंत या वर्षात पहिल्या दिवशी दमदार कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये ‘जुग जुग जियो’चा समावेश झाला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ हा चित्रपट आहे. तर ‘जुग जुग जियो’ हा पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीने भूमिका साकारली आहे.