Drishyam 2 | कमाल आर खान याने केली अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ वर टीका, वाचा काय म्हणाला केआरके

| Updated on: Nov 18, 2022 | 6:58 PM

काही दिवसांपूर्वी केआरकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पठाण चित्रपटाला सपोर्ट करणार असल्याचे म्हटले होते.

Drishyam 2 | कमाल आर खान याने केली अजय देवगणच्या दृश्यम 2 वर टीका, वाचा काय म्हणाला केआरके
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले कमाल आर खान पुन्हा एकदा बाॅलिवूडला टार्गेट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पठाण चित्रपटाला सपोर्ट करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, परत युटर्न घेत पठाण चित्रपटावर काही दिवसांपूर्वी केआरकेने टीका केली होती. आता केआरकेच्या निशाण्यावर अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट आहे. दृश्यम 2 चित्रपटावर केआरकेने टीका केलीये.

अजय देवगणच्या दृश्यम 2 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. इतकेच नाही तर चित्रपटाला रिव्ह्यू देखील जबरदस्त मिळाले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग केल्याचे सांगितले जात आहे.

यादरम्यान बाॅलिवूड चित्रपटांना कायमच आपला निशाना बनवणारा केआरके याने या चित्रपटावर टीका केली असून यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. काही दिवस शांत राहून परत एकदा बाॅलिवूडविरोधात केआरके सक्रिय झालाय.

केआरकेने म्हटले आहे की, पहिल्या तासामध्ये फक्त अजय देवगण आणि त्याची फॅमिलीच दिसते. ‘दृश्यम 2 हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे आणि हिंदी चित्रपट मल्याळमच्या ‘दृश्यम 2’ ची फ्रेम टू फ्रेम कॉपी आहे, ज्या लोकांनी मूळ चित्रपट पाहिला आहे, ते अजय देवगणचा स्टारर चित्रपट का पाहतील?

दृश्यम 2 च्या स्टोरीबद्दल सांगायचे तर, पहिल्या भागात अजय देवगण केबलचा व्यवसाय चालवतो आणि दुसऱ्या भागात, तो सिनेमा हॉलचा मालक बनला आहे हे कसे शक्य असल्याचे म्हणत चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप केआरकेने घेत मोठी पोस्ट शेअर केली आहे.