Kangana Ranaut Controversy : कंगना, हाजीर होSSS! शीख समुदायावरील टिप्पणी कंगनाला महागात पडणार?

| Updated on: Dec 13, 2021 | 3:20 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काहीवेळा ती तिच्या वक्तव्यामुळे अडचणीतही येते. अलीकडेच कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात टिप्पणी केली होती, त्यानंतर तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.

Kangana Ranaut Controversy : कंगना, हाजीर होSSS! शीख समुदायावरील टिप्पणी कंगनाला महागात पडणार?
कंगना राणौत
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काहीवेळा ती तिच्या वक्तव्यामुळे अडचणीतही येते. अलीकडेच कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात टिप्पणी केली होती, त्यानंतर तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.

कंगनाविरोधातील तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्यावर कोर्टाने कंगनाला 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांकडे तिचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास सांगितले होते. यासोबतच महाराष्ट्र सरकारने 25 जानेवारीपर्यंत त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे मान्य केले आहे.

कंगनाची प्रतिक्रिया वादात!

सरकारने कृषी कायदा मागे घेतल्यानंतर संतप्त कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात टीका केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेक वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. यानंतर ती ट्रोलही झाली होती. यापूर्वी तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ असेही संबोधले होते. तसेच, अनेक अपशब्द वापरले होते.

एफआयआर दाखल झाला!

कंगनाच्या पोस्टनंतर दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने एफआयआर दाखल केला होता. समितीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांनी कंगनाच्या विरोधात मंदिर मार्ग पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर, शीख समाजाच्या भावना दुखावण्यासाठी त्यांनी ती पोस्ट जाणूनबुजून तयार केली होती. कंगनाच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.

कंगनाकडे चित्रपटांची रांग

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रनौतकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. तिचा ‘तेजस’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘धडक’, ‘इमर्जन्सी’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनयासोबतच कंगना चित्रपटांची निर्मितीही करत आहे. अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

काही काळापूर्वी कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कंगनाच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. ‘थलायवी’ हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. अभिनय ते राजकारण असा त्यांचा कारकिर्दीचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Mouni Roy | निळ्याशार समुद्र किनारी मौनी रॉयचा जलवा, बिकिनी लूकने चाहत्यांना केलेय घायाळ!

Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान