Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?

Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?
Sara-Janhvi-Ibrahim

बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींना मोठ-मोठ्या वाहनांमध्ये अनेकदा स्पॉट केले जाते. पण, नुकतेच सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्यानंतर चक्क टॅक्सीमधून जाताना दिसल्या होत्या आणि यावेळी सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानही त्यांच्यासोबत उपस्थित होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 13, 2021 | 1:00 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींना मोठ-मोठ्या वाहनांमध्ये अनेकदा स्पॉट केले जाते. पण, नुकतेच सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्यानंतर चक्क टॅक्सीमधून जाताना दिसल्या होत्या आणि यावेळी सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानही त्यांच्यासोबत उपस्थित होता.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी जवळपास एकाच वेळी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या दोन्ही स्टार किड्समध्ये खूप छान बाँडिंग आहे. रोमिंगपासून ते अनेक इव्हेंट्सपर्यंत त्या दोघी एकत्र दिसल्या आहेत. रविवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये एपी ढिल्लनचा एक कॉन्सर्ट झाला. जिथे सारा आणि जान्हवीसोबत इब्राहिम अली खान देखील उपस्थित होता. मैफल संपल्यावर तिघेही बाहेर आले आणि चक्क टॅक्सीने घरी जायला निघाले. व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्सने या व्हिडीओला खूप व्हायरल केले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सारा आणि जान्हवी टॅक्सीत बसल्यावर तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सारा याआधीही अनेकदा ऑटोने प्रवास करताना दिसली होती. मात्र, कॅमेरा पाहताच जान्हवी आपला चेहरा लपवताना दिसली. हा व्हिडीओ फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘भरपूर गर्दी असेल, गाडी पार्क करायला जागा नसेल, म्हणून गाडीने गेल्या नाहीत.’  तर एक यूजर म्हणाला- ‘अरे देवा, पेट्रोलच्या किमतीमुळे लोक बघा कुठून कुठे आले?’  काहींनी याला थेट पब्लिसिटी स्टंटही म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘जान्हवी आणि सारा, चला टॅक्सी-कॅबमधून प्रवास करूया, प्रसिद्धी मिळवूया. प्रेक्षक म्हणतील वाह कितने डाउन टू अर्थ है. नाहीतर मीम्स बनवले तर ते तरी व्हायरल होतील.

ही दोस्ती तुटायची नाय…

जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बॉलिवूडच्या नवीन बेस्ट फ्रेंड आहेत. दोघांची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. यापूर्वी दोघी जिममध्ये एकत्र वर्कआउट करायच्या आणि आता दोघीही एकत्र ट्रिप एन्जॉय देखील करतात. काही दिवसांपूर्वी सारा आणि जान्हवी केदारनाथ मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिरात जाताना दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सारा आणि जान्हवी दोघीही जितक्या ग्लॅमरस आहेत तितक्याच त्या दोघीही पूजा भक्तीवर विश्वास ठेवतात.

अलीकडेच जान्हवी आणि सारा रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर शो’मध्ये देखील दिसल्या. यादरम्यान दोघांनी रणवीरसोबत खूप मस्ती केली. दोघांची मैत्री चाहत्यांनाही पसंत पडत आहे. यापूर्वी जान्हवी आणि साराची एकमेकांसोबत तुलना केली जायची.

हेही वाचा :

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें