कार्तिक आर्यन याचे सारा अली खान आणि क्रिती सेनन यांच्यासोबत अफेअर? अखेर अभिनेत्याने केले मोठे भाष्य

गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चा रंगत होत्या की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे एकमेंकांना डेट करत आहेत. मात्र, कार्तिक आर्यन किंवा सारा अली खान यांनी कधीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही.

कार्तिक आर्यन याचे सारा अली खान आणि क्रिती सेनन यांच्यासोबत अफेअर? अखेर अभिनेत्याने केले मोठे भाष्य
| Updated on: Feb 18, 2023 | 3:40 PM

मुंबई : कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. काल चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) हा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शहजादा या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहजादा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याने जबरदस्त भूमिका केलीये. कार्तिक आर्यन याच्या शहजादा (Shehzada) या चित्रपटाला पठाण चित्रपटामुळे मोठा फटका बसला आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून पठाण चित्रपटाच्या तिकिटाच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आलीये. शाहरूख खान याचा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला. आता चित्रपटाला रिलीज होऊन २४ दिवस झाले अजून चित्रपटाची जादू अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. एकीकडे कार्तिक आर्यन हा त्याच्या शहजादा चित्रपटामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे कार्तिक आर्यन हा सारा अली खान (Sara Ali Khan) आणि क्रिती यांच्या नात्यामुळे चर्चेत आलाय.

गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चा रंगत होत्या की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे एकमेंकांना डेट करत आहेत. मात्र, कार्तिक आर्यन किंवा सारा अली खान यांनी कधीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. रिअल लाईफमध्ये हे कधी कपल बनू शकले नाही.

फक्त सारा अली खान हिच नाही तर क्रिती सेनन हिच्यासोबतही कार्तिक आर्यन याचे नाव जोडले गेले होते. आता पहिल्यांदाच यावर कार्तिक आर्यन याने मोठे भाष्य केले आहे. रॅपिड फायर राउंडमध्ये यावर कार्तिक आर्यन याने उत्तरे दिली आहेत.

डेअर ऑल रॅपिड फायरमध्ये कार्तिक आर्यन याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी सर्वात अगोदर कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, तू अविवाहित आहे का? यावर कार्तिक आर्यन म्हणाला की, हो….परत कार्तिक आर्यन याला विचारण्यात आवे की, तू कधी सारा अली खान हिला डेट केले आहे का? यावर अत्यंत लाजून कार्तिक म्हणाला नाही…

पुढे कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, तू कधी क्रितीला डेट केले आहे का? यावर कार्तिक याने काहीच स्पष्ट सांगितले नाही. म्हणजेच सारा अली खान हिच्याबद्दल कार्तिक आर्यन हा अत्यंत स्पष्ट बोलला, परंतू त्याने क्रितीसोबत असलेल्या रिलेशनवर उत्तर देणे टाळले.