
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. अत्यंत खासगी पध्दतीने यांचा शाही विवाहसोहळा हा पार पडला. लग्नाचे काही खास फोटो हे आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर (Social media) कतरिना आणि विकी यांनी शेअर केले. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांच्या लग्नाला बाॅलिवूडच्या अनेक स्टारने देखील हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच लग्नाचा पहिला वाढदिवस हा धुमधडाक्यात साजरा करताना कतरिना कैफ आणि विकी काैशल (Vicky Kaushal) हे दिसले होते. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे हिल स्टेशनला गेले होते.
कतरिना कैफ ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. दिवाळीला कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिना कैफ आणि सलमान खान यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यास चाहते आतुर आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटालाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.
सोशल मीडियावरही गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ ही सक्रिय आहे. नुकताच कतरिना कैफ हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमुळे कतरिना कैफ ही चर्चेत आलीये. कतरिना कैफ हिचे हे फोटो पाहून अनेकांना विकी काैशल याची आठवण आलीये. कतरिना कैफ हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
एकाने कतरिना कैफ हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, कतरिना कैफ हिने विकी काैशल याचे शर्ट घातले आहे. दुसऱ्याने लिहिले की, विकी काैशल याच्या शाळेचे हे जुने शर्ट दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, लग्न झाल्यापासून कतरिना कैफ हिचा खर्च अत्यंत कमी झाला असून फोटोशूट ही आता घरीच करत आहे ते पण विकी काैशल याच्या जुन्या शर्टवरच…
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे कतरिना कैफ ही फोन भूत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली होती. मात्र, कतरिना कैफ हिच्या या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि परिणामी कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट फ्लाॅप गेला. यादरम्यान जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट देखील फ्लाॅप गेला होता.