AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : आधी महिलांच्या डब्यात चढला, तरूणीने रोखल्यावर धावत्या लोकलमधून थेट.. प्रवासी सुन्न !

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढलेल्या एका पुरुषाने विरोध केल्याने 18 वर्षीय तरुणीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले. या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, इतर महिला प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षित प्रवासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Crime : आधी महिलांच्या डब्यात चढला, तरूणीने रोखल्यावर धावत्या लोकलमधून थेट.. प्रवासी सुन्न !
mumbai crime
| Updated on: Dec 22, 2025 | 11:03 AM
Share

मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलमधून लाखो जण प्रवासी करतात. रोजच्या प्रवाशांना गर्दीची कल्पनाही असते, पण कधीकधी याच लोकलमध्ये असं काही घडतं की डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, मन अगदी सुन्नं होतं. असाच एक धक्कादायक प्रकार आणि अंगावर शहारे आणणारी घटना लोकलमध्ये घडली आहे. महिलांच्या डब्यात एक पुरूष चढला, ते पाहून इतर महिलांनी त्याला खाल उतरण्यास सांगितलं. मात्र यामुळे संतापलेल्या त्या इसमाने एका 18 वर्षाच्या तरूणीला धावत्या लोकलमधूने थेट खाली ढकलून फेकून दिलं. यामुळे प्रवाशांना प्रचंड धक्का बसला, अनेक जण सुन्न झाले. मात्र काही महिला प्रवाशांवी हिंमत दाखवत त्या आरोपी प्रवाशाला पकडलं आणि जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आधी डब्यात चढला, नंतर तरूणीलाच लोकलमधूीन ढकललं

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय शेख अख्तर नवाज असे आरोपीचे नाव असून तो मुंबईल लोकलमधील महिलांच्या डब्यात चढला होता. ते पाहून डब्यातील काही महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं, यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली. एका 18 वर्षांच्या तरूणीनेही नवाज याला विरोध दर्शवत खाली उतरायला सांगितलं. मात्र ते ऐकून आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देऊन बाहेर फेकलं. खाली पडलेली ती तरूणी गंभीर जखमी झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली.

ट्रेनमधून पडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने कसाबास वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.  कुटुंबीयांनी तातडीने तिला शोधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या तरूणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याच दरम्यान त्या लोरकलमधील इतर महिलांनी आरोपी नवाजला पकडलं आणि त्याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसा ढवळ्याही महिला सुरक्षित नसल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पनवेल जीआरपी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.