मामाच्या मुलाशीच लग्न… वारंवार बलात्कार तर कधी मानसिक अत्याचार… कुख्यात डॉनच्या मुलीनं थेट मोदींकडून मागितली मदत
मामाच्या मुलाची नववी बायको... वारंवार बलात्कार तर कधी मानसिक अत्याचार... हत्येचा देखील प्रयत्न... कुख्यात डॉनच्या मुलीचं खडतर आयुष्य... तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागितली मदत

1970 च्या दशकातील मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान याची मुलगी हसीन मस्तान मिर्झा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. बळजबरी लग्न, वारंवार बलात्काक, हत्येचा प्रयत्न आणि संपत्ती बळकावल्यामुळे हसीन मिर्झा हिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमिक शाह यांच्याकडून मदत मागितली आहे. 1996 मध्ये अल्पवयीन असताना हसीन हिचं मामाच्याच मुलासोबत बळजबरी लग्न लावून दिलं… अशात हसीन हिने केलेल्या दाव्यानुसार, त्याच व्यक्तीने डॉनच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला… शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले… एवढंच नाही तर, ओळखीचा गौरवापर करुन तिची संपत्ती देखील बळकावण्याचा प्रयत्न केला.. हसीन हिने केलेल्या दाव्यानुसार, आरोपी व्यक्तीने तिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी आठ वेळा लग्न केलं होतं.
लहान हसीन हिच्यासोबत वाईट घडल्यामुळे तिचं कोणी समर्थन केलं नाही. हसीन म्हणाली, ‘माझ्यावर बलात्कार झाला… हत्याचा प्रयत्न करण्यात आला… माझा बाल-विवाह झाला… माझी संपत्ती बळकावली आणि माझी ओळख देखील लपवण्यात आली… जर कायदे कठोर असतील तर लोकं गुन्हा करण्याआधी घाबरतील…’ एवढंच नाही तर, सतत होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून हसीन हिने तीनवेळा आत्महत्येचा देखील विचार केला.
हसीन हिच्या आयुष्यातील वास्तव तेव्हा समोर आलं जेव्हा तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हसीन म्हणालेली, ‘अनेक वर्ष न्यायासाठी भटकत होती… पण अजून पर्यंत न्याय मिळालेला नाही…’ असं देखील हसीन म्हणाली होती.
मुंबईच्या कुख्यात डॉनच्या मुलीसोबत असं कसं होऊ शकतं? अशा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला. यावर विनंती करत हसीन म्हणाली, ‘यामध्ये माझे वडील हाजी मस्तान यांचा सतत उल्लेख होत आहे… तर हे सत्या माझ्या वडिलांचं नाही… त्यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर हे सर्वकाही झालं… मी त्यांची मुलगी नक्कीच आहे. पण माझा संघर्ष खासगी आहे… माझ्या वडिलांनी काही चांगली कामे केली असतील, म्हणून मी आज सुरक्षित आहे…’
हसीन हिने असा देखील दावा केला की, वडिलांच्या निधनाबद्दल देखील तिला काहीच माहिती नव्हतं… ‘लग्नानंतर मला माझ्या कुटुंबियांपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं… दोन वर्षांनंतर माझ्या वडीलांचं निधन झाल्याचं मला कळलं… त्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडली…’ असं देखील हसीन म्हणाली.
हाजी मस्तान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, हाजी मस्तान हा मुंबईतील सुरुवातीच्या गुंडांपैकी एक होता. 1970 च्या दशकात त्याच्या नावाने अंडरवर्ल्डमध्ये भीती निर्माण झाली. नंतर तो चित्रपट निर्माता बनला. त्याच्या मृत्यूनंतर, मुलगी, हसीन मिर्झा, हिने तिच्या वडिलांच्या वारसा आणि मालमत्तेसाठी दीर्घ लढाई लढली.
