AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singer KK: केके यांना अखेरचा निरोप देण्याआधी मुलीची भावूक पोस्ट

केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला.

Singer KK: केके यांना अखेरचा निरोप देण्याआधी मुलीची भावूक पोस्ट
Singer KK's daughterImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 5:08 PM
Share

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फिल्म आणि संगीत विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. जावेद अख्तर, शंकर महादेवन, विशाल आणि रेखा भारद्वाज, श्रेया घोषाल, अल्का याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, जावेद अली, हरिहरन यांनी केके यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. वडिलांना अखेरचा निरोप देण्यापूर्वी केके यांच्या मुलीने (KK daughter) भावूक पोस्ट लिहिली. केके यांची मुलगी तामरा (Taamara) आणि त्यांची पत्नी ज्योती यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट लिहिली. केके यांच्या अंत्यविधीबाबतची माहिती देताना त्यांनी फोटोसुद्धा शेअर केला.

‘लव्ह यू फॉरेव्हर डॅड’ अशी पोस्ट केके यांच्या मुलीने लिहिली आणि तीच पोस्ट केके यांची पत्नी ज्योती यांनी शेअर केली. कोलकातामधील नजरुल मंच इथं एका कॉलेजच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना केके यांना हृदयविकाराचा झटका आला. केके यांना दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित समस्या होत्या, असं त्यांच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सलमान खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, दिया मिर्झा, अक्षय कुमार, अजय देवगण, शनाया कपूर, विशाल भारद्वाज यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली.

केके यांच्या मुलीची पोस्ट-

केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 1994 मध्ये मुंबईत आलेल्या केके यांना संगीतकार-गायक लेस्ली लेवीस यांनी संधी दिली. एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या केके यांच्या ‘पल’ आणि ‘तडप तडप के’ या गाण्यांनी अभूतपूर्व यश मिळविला.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा