KK Video : कॉन्सर्टमध्ये गाणं संपवलं, माईकही दिला! हॉस्टिपलमध्ये नेण्याआधी स्टेजवर केकेसोबत काय घडलं?

KK Video News : पहिल्यांदाच स्टेजवरुन रेकॉर्ड करण्यात आलेला केकेचा मृत्यूआधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

KK Video : कॉन्सर्टमध्ये गाणं संपवलं, माईकही दिला! हॉस्टिपलमध्ये नेण्याआधी स्टेजवर केकेसोबत काय घडलं?
मृत्यूआधीचे अंगावर काटा आणणारे क्षण
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 01, 2022 | 10:15 AM

कोलकाता : सुप्रसिद्ध गायक केकेच्या मृत्यूनंतर (Singer KK Death Last video) आता कॉन्सर्टमधील वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या व्हिडीओमध्ये केकेचा शेवटच्या परफॉरमन्स नंतर स्टेजवर नेमकं काय घडलं, हे समोर आलंय. केकेनं आपल्या कॉन्सर्टमधील शेवटचं गाणं संपवलं. त्याआधीच तो अस्वस्थ असल्याचं सहकाऱ्यांना कळालं होतं. आपण शेवटचं गाणं संपवलून केकेनं स्टेजवर असलेल्या आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याच्या हातात माईक दिला. प्रेक्षकांकडे पाठ फिरवल्यानंतर केके बिथरलेला असल्याचं व्हिडीओमध्ये (KK Video) दिसून आलंय. त्याला असह्य त्रास होत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन जाणवलंय. दरम्यान, नेमक्या याच क्षणी स्टेजवर असलेल्या दोघांनी लगेचच केकेचा हात पकडला आणि त्याला स्टेजवरुन बाहेर घेऊन जात त्याला थेट रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केल्यानं सगळ्यांच्यात पायाखालची जमीन सरकली.

कोलकात्यामधील एका ऑडिटोरीअमध्ये केकेच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टमध्ये केकेनं तासभर परफॉर्म केलं होतं. त्याच्या परफॉरमन्सच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. स्टेजवरुन काढण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये केके आपलं शेवटचं गाणं संपवतो. माईक सहकाऱ्याकडे देतो. प्रेक्षकांना अभिवादन करतो आणि मागे फिरतो. स्टेजच्या मागच्या बाजूला येताच केकेची प्रकृती खालावल्याचं स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ :

पहिल्यांदाच स्टेजवरुन रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडीओ समोर आला आहे. याआधी प्रेक्षकांमधून आणि स्टेजवरुन बाहेर नेतानाचा केकेचा व्हिडीओ समोर आला होता. आता माधुरी राव नावाच्या एका ट्वीटर युजरने केकेचा नवा व्हिडीओ शेअर केलाय.

प्रेक्षकांनी काढलेला व्हिडीओ

रुग्णालयात नेतानाचा ऑडिटोरीअमच्या लॉबीतील व्हिडीओ

वयाच्या 53 व्या वर्षी केकेच्या अकाली मृत्यूनं संपूर्ण कलासृष्टी हादरुन गेली आहे. आपल्या गायकीनं चाहत्यांच्या मनात घर केलेल्या केकेची एक्झिट चाहत्यांच्या काळजाला चटका लावून गेली आहे. 31 मे रोजी रात्री केकेचं कोलकात्यात एक कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टनंतर केकेला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.