AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात हॉटेलात चुली पेटल्या, इतक्या दिवसांचा गॅसचा स्टॉक, सोलापुरात भरारी पथक, नागपुरात…; युद्धामुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

गेल्या आठ-नऊ दिवसांपासून इजरायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मोठे संकट आले आहे. या युद्धामुळे एलपीजी (LPG) आणि इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत.

पुण्यात हॉटेलात चुली पेटल्या, इतक्या दिवसांचा गॅसचा स्टॉक, सोलापुरात भरारी पथक, नागपुरात...; युद्धामुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
LPGImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 2:23 PM
Share

इजरायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर एलपीजी (LPG) आणि इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. भारतातही याचा परिणाम दिसू लागला असून, विशेषतः महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि पंढरपूर यांसारख्या भागांत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात घट झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या आहेत.

पुणे विभागात एक महिना पुरेल इतका गॅस साठा उपलब्ध

पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या एक महिना पुरेल इतका घरगुती एलपीजी साठा उपलब्ध आहे. अफवा पसरवून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून, विभागातील पाच जिल्ह्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अद्याप काळाबाजाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूरमध्ये भरारी पथकाची कारवाई

सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण ९४ गॅस एजन्सी सुरळीत कार्यरत आहेत. घरगुती गॅस पुरवठा सामान्य आहे, परंतु कमर्शियल बुकिंग थांबवण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचा साठाही पुरेसा असून पुरवठा सुरळीत आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या स्टॉकची पाहणी करण्यासाठी ४ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

नागपूरमध्ये विशेष पथकाची तपासणी

नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडर टंचाईच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष पथक नेमले आहे. या पथकात जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी आणि गॅस एजन्सीचे प्रतिनिधी सामील आहेत. शहरातील हॉटेल्सना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. टंचाई आढळल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिवमध्ये कमर्शियल पुरवठा बंद

धाराशिव जिल्ह्यात भारत गॅस आणि एचपी गॅसच्या प्रमुख वितरण केंद्रांवरून व्यावसायिक गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. घरगुती वापराला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संकुलांसारख्या आवश्यक सेवांना प्राधान्याने पुरवठा करण्याच्या सूचना एजन्सींना देण्यात आल्या आहेत. गॅस साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. घरगुती पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अन्नछत्रावर फटका

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा बसल्या आहेत. दररोज सुमारे १० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप केला जातो, ज्यासाठी दररोज सहा गॅस सिलेंडर वापरले जातात. सध्या फक्त दोन-तीन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक राहिल्याने मंदिर समितीसमोर अन्नछत्र चालवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. इंधन टंचाईमुळे देवस्थानांनाही फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील हॉटेल्समध्ये संकट

पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. एकाच वेळी एजन्सींवर गर्दी झाल्याने सर्व्हर समस्या उद्भवल्या आहेत. ओटीपी संबंधित तांत्रिक अडचणींमुळेही गोंधळ होत असल्याचे गॅस वितरकांनी सांगितले.

सरकारचे प्रयत्न

केंद्र आणि राज्य सरकारने घरगुती एलपीजीला प्राधान्य देण्यासाठी रिफायनरीजना निर्देश दिले आहेत. कमर्शियल क्षेत्रातील पुरवठा मर्यादित करून घरगुती वापरासाठी साठा वाढवला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे आणि आवश्यकतेनुसारच बुकिंग करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला