Video: पार्टीत ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर मलायका-अर्जुनचा जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव

कुणाल रावलच्या प्री-वेडिंग पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.

Video: पार्टीत छैय्या छैय्या गाण्यावर मलायका-अर्जुनचा जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव
Video: पार्टीत 'छैय्या छैय्या' गाण्यावर मलायका-अर्जुनचा जबरदस्त डान्स
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 1:50 PM

प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हे दोघं लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी कुणालने बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींसाठी प्री-वेडिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बी-टाऊनमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. अर्जुन कपूर, मलायकार अरोरा, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंह, जान्हवी कपूर, वरुण धवन, नताशा दलाल यांसारखे सेलिब्रिटी पार्टीला हजर होते. सध्या सोशल मीडियावर या पार्टीतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन (Arjun Kapoor) ‘छैय्या-छैय्या’ (Chaiyya Chaiyya) गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

कुणाल रावलच्या प्री-वेडिंग पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला. छैय्या-छैय्या गाण्यावर या दोघांनी एकमेकांसोबत डान्स केला. त्यानंतर अर्जुनने मलायकाच्या माथ्यावर किससुद्धा केलं. प्री-वेडिंग पार्टीचा थीम ‘व्हाईट अँड ब्लॅक’ असल्याने मलायकाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर अर्जुनने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. डान्स फ्लोअरवरील या दोघांच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

मलायका-अर्जुनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘क्यूट कपल’ अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘दोघांची केमिस्ट्री खूपच भारी आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. मुंबईतील कुलाबा इथल्या ताज महाल पॅलेसमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील वरुण धवनचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. रॅपर आणि गायक बादशाहसोबत तो स्टेजवर ‘गर्मी’ या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.