
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज काही नवीन नाही. 70 च्या दशकापासून अभिनेत्री छोटे कपडे घालत आल्या आहेत. सोबतच 70-80 च्या दशकातील अभिनेत्री आणि आजही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावर छोटे कपडे वापरायला पूर्णपणे नकार दिला आहे. आजच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणायचं तर साई पल्लवी हे नाव सर्वात आधी येतं.
नेहमीच लहान कपडे घालणे टाळले
अशीच एक अभिनेत्री जिने नेहमीच लहान कपडे घालणे टाळले आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की ती लहान कपडे घालणार नाही किंवा डिप नेक असलेले ब्लाउज घालणार नाही. आणि तिने तिचा हा नियम कधीही मोडला नाही. तिने कायमच चित्रपटांमध्ये एकतर साड्या नेसल्या किंवा पंजाबी ड्रेस. पण एका सीनसाठी तिला असे कपडे घालावे लागे ल की तिला तिचीच लाज वाटली. त्यादिवशी ती सेटवर ढसाढसा रडली.
घागरा आणि डिप गळ्याचा ब्लाऊजमुळे अडचण
ही अभिनेत्री म्हणजे मौसमी चॅटर्जी. ज्यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका केल्या. प्रक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. मौसमी यांनी त्यांच्या काळातील राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि विनोद मेहरा यांच्यासह अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले.
मौसमी चॅटर्जी यांनी खूप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली पण त्यांनी चित्रपटांसाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. त्यांचा एक नियम होता की त्या कधीही लहान कपडे घालणार नाही. मौसमी चॅटर्जी यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.
निर्वस्त्र होण्याचा अनुभव येत होता
मात्र एकदा त्यांनी दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून घागरा आणि डिप गळ्याचा ब्लाऊज घालावा लागला होता. तो त्यांच्यासाठी सर्वात धक्कादायक अनुभव होता. त्यांनी असेही म्हटले की ते कपडे त्यांच्यासाठी इतके लाज आणणारे होते की त्यांना जणू त्या कपड्यांमध्ये निर्वस्त्र होण्याचा अनुभव येत होता.
हा किस्सा आहे 1973 मध्ये राज खोसला यांच्या ‘कच्चे धागे’ या चित्रपटावेळेचा. मौसमी यांनी विनोद खन्ना आणि कबीर बेदीसोबत हा चित्रपट केला होता. मानी जे राबडी यांनी तिला चित्रपटासाठी बॅकलेस ब्लाउज आणि शॉर्ट घागरा घालायला दिला होता. त्या दिवशी त्या चक्क सेटवर रडल्या होत्या.
नवऱ्याला फोन केला अन् सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री
मौसमी म्हणाल्या ‘ते कपडे पाहून मला असे वाटले की मी नग्न झाले. आणि मी रडू लागले. मी माझ्या पतीला फोन केला आणि म्हणालो की कृपया मला कोलकात्याला परत पाठवा. मला आता इथे काम करायचे नाही. ते माझे सर्व कपडे काढू इच्छितात. मग माझे पती लगेच आले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की या कपड्यांमध्ये काहीही चूक नाही. हे चित्रपटासाठी ठीक आहे.’ त्यानंतर मग त्यांनी हा सीन केला.
मौसमी चॅटर्जी यांनी हेही सांगितले की, त्यांनी हृषिकेश मुखर्जी यांचा ‘गुड्डी’ चित्रपट फक्त कपड्यांमुळे नाकारला होता. कारण त्यांना या चित्रपटात स्कर्ट घालायचा होता. मग त्यांच्याऐवजी जया बच्चन यांना घेण्यात आलं आणि या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवलं.