AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price: 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला आज किती किंमत? जुन्या दागिन्यांना का मिळत नाहीत योग्य दाम?

Gold Price Today: सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारतात सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीत सातत्याने चढउतार दिसत आहे. अशा वेळी 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला आज किती किंमत मिळेल? जुन्या दागिन्यांना का मिळत नाहीत योग्य दम?

Gold Price: 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला आज किती किंमत? जुन्या दागिन्यांना का मिळत नाहीत योग्य दाम?
जुन्या दागिन्यांना का नाही योग्य दाम?Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 10, 2026 | 2:37 PM
Share

Gold Price Today: सोन्याच्या किंमती दिवागणिक वाढत आहेत. सोन्याच्या किंमती लवकरच दोन लाखांचा टप्पा ओलांडतील असा दावा करण्यात येत आहे. सध्या सराफा बाजारात सोन्याची चकाकी वाढली आहे. सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही. मौल्यवान धातूच्या किंमतीत सातत्याने चढउतार दिसत आहे. अशावेळी 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला आज किती किंमत मिळेल? जुन्या दागिन्यांना का मिळत नाहीत योग्य भाव? काय आहे त्यामागील कारण?

भारतात सोने खरेदी करणे ही एक परंपरा आहे. महिला सोने खरेदीला अधिक महत्त्व देतात. सोने खरेदी करणे ही एक मौल्यवान गुंतवणूक मानल्या जाते. कारण गरजेवेळी हे सोने वापरता येते. जर तुम्ही जुने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही सोने विक्री करत आहात तो ज्वेलर विश्वासू हवा. सोन्यातील कृत्रिम मोती वा इतर चकाकणारे दगड काढून घेण्यात येतात. सोन्याची दागिने खरेदी करताना या आर्टिफिशिअल माणिक-मोतीची किंमत पण जोडलेली असते. त्यानंतर सराफा सोने वितळून त्याचे मूल्य निश्चित करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉलमार्क असलेले दागिने वितळण्याची गरज नसते. त्यामुळेच हॉलमार्क दागिने खरेदीचा सल्ला दिल्या जातो.

पाच वर्षांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव भारतात जवळपास 48,000 ते 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव दीड लाखांच्या पुढे आहे. या किंमतींवर नजर टाकली तर पाच वर्षात सोन्याची किंमत तिप्पट झाल्याचे दिसून येते. सोन्याने या पाच वर्षात मोठी झेप घेतल्याने सोन्यातून मोठा परतावा मिळत आहे. पण ज्यांनी ठोक सोने घेतले. बिस्कीट, विट अथवा कॉईन त्यांना त्याचे थेट लाभ होतात. पण सोन्याची दागिने खरेदी करणार्‍यांना त्याप्रमाणात लाभ मिळत नाही. कारण कॅरेटनुसार प्रत्येक दागिन्यात इतर धातूंचे मिश्रण असते. सोने वितळल्यावर जो गोळा अथवा तुकडा समोर येतो, त्याआधारे मग सोन्याची किंमत देण्यात येते. परिणामी अनेकदा जुन्या दागिन्यांवर ग्राहकांना नेहमी योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना समोर येते.

मेकिंग चार्ज आणि डिझाईन

जेव्हा सोन्याची दागिने आपण खरेदी करतो, त्यावेळी त्याची डिझाईन, पॅटर्न आणि फॅशन अधिक लक्षात घेतली जाते. त्यानुसार या दागिन्यांची किंमत वाढते. यामध्ये घडणावळ, मेकिंग चार्जेस, डिझाईन, GST, डायमंड, स्टोन वर्क याचाही पैसा मोजावा लागतो. पण ज्यावेळी आपण हा दागिना विक्री करायला जातो. तेव्हा या सर्व वस्तूंचे मूल्य परत मिळत नाही, केवळ वितळून जो तुकडा अथवा सोन्याचा गोळा उरतो, त्याचीच किंमत मिळते. त्यावेळी ग्राहकाला इतर कोणताही खर्च परत मिळत नाही. त्यामुळे अनेकदा जुने दागिने विक्रीवर योग्य किंमत मिळत नसल्याचे ग्राहकांना वाटते.

Follow Us
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या