धमकी प्रकरणी सलमान खानचा जबाब नोंदवला, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले, “प्रकरण गंभीर”

| Updated on: Jun 06, 2022 | 7:02 PM

Salman Khan Death Threat : धमकी प्रकरणी सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय.

धमकी प्रकरणी सलमान खानचा जबाब नोंदवला, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले, प्रकरण गंभीर
सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ?
Follow us on

मुंबई : सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र आल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. धमकी प्रकरणी सलमान खानचा जबाब आता नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय. सलमान खानला धमकी (Salman Khan Death Threat) येणं गंभीर आहे. या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. आम्ही सलमान खानला मिळालेल्या पत्राची आणि या संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी करत आहोत. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. मात्र आणखी गरज पडल्यास आम्ही सलमानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत आहोत.

सलमान खानचा जबाब नोंदवला

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याला कुणावर संशय आहे का, याआधी त्याला अशी धमकी कधी आली होती का असे प्रश्न त्याला विचारण्यात आला. पण त्याने पोलिसांना काय जबाब दिला ते प्रकाशझोतात आलेलं नाही. त्याच्यासोबतच त्याचे वडील सलीम खान यांचाही जबाब नोंदवला गेला आहे.

सलमानच्या सुरक्षेत वाढ

सकाळपासूनच माध्यमांचे कॅमेरे आणि सलमान खानचा बंगला याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पोलिसांनी सुरक्षे वाढ केली असून सर्व खबरदारी बाळगली जातेय. या पत्राने सगळ्या भाईजानच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. आता या पत्रामागे नेमकं कोण आहे, याचा तपास केला जातोय.

हे सुद्धा वाचा

सलमान खानला धमकीचं पत्र आल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सलमानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जावून आढावा घेतला.

अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र सलीम खान यांच्या बॉडिगार्डला सापडलं. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्याठिकाणी हे पत्र आढळलं. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचं निनावी पत्र रविवारी वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सापडलं.