तीन चटया आणि जीम… नाना पाटेकर यांच्या मुंबईतील घरात नेमकं काय?
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असूनही, त्यांचे मुंबईतील घर अत्यंत लहान (750 चौ. फूट, 1BHK) आणि साधे आहे. घरात फक्त तीन चटया आणि एक जीम आहे, कोणत्याही ऐषोरामाच्या वस्तू नाहीत. बालपणी पाहिलेल्या गरिबीमुळेच नाना साधे आयुष्य जगतात.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या साधेपणाची चर्चा होत आहे. बॉलिवूड गाजवणारा नट, एक एका सिनेमासाठी मोठी रक्कम घेणारा नट असूनही नाना पाटेकर नेहमी साधं राहायचं. साधच जेवण घ्यायचे. कोणताही बडेजाव नव्हता. पार्ट्यांचा शौक नव्हता. चमचमीत खाण्याचा मोह नव्हता. त्याचं कारण म्हणजे नाना पाटेकर यांनी अत्यंतिक गरीबी पाहिली होती. पडत्या काळात मित्रांकडून उसन उधारी घेऊन त्यांनी गुजराण केली होती. म्हणूनच नाना पाटेकर अत्यंत साधे राहत होते.
नाना पाटेकर यांचं अंधेरीत घर आहे. अत्यंत छोटं आणि साधं असं हे घर आहे. 750 चौरस फुटाचं हे घर आहे. म्हणजे वन बीएचकेचा फ्लॅट आहे. या घरात नाना पाटेकर त्यांच्या आई सोबत राहायचे. घर छोटसं होतं. त्यामुळे नानांच्या गरजाही मर्यादित होत्या. या घरात तीन चटया आणि एक जीम होती. काही पुस्तके होते. त्याशिवाय कोणतेही ऐषारामाचं साधन या घरात नव्हतं. याबाबत एका कार्यक्रमात स्वत: नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं.
रोज 16 किलोमीटरचा पायी प्रवास
आपल्या साध्या राहणीमानाचं रहस्य नाना पाटेकर यांनी उलगडलं होतं. माझ्याकडे काहीच नव्हतं. 13 व्या वर्षी नोकरीला लागलो. 8 किलोमीटर चालत जायचं आणि 8 किलोमीटर परत यायचं. 16 किलोमीटर. आणि वय किती? 9वीमध्ये असताना. मग एकवेळचं जेवण मिळायचं. 35 रुपये महिन्याला मिळायचे. त्यामुळे त्यावेळचं जे जगणं आहे, त्यापेक्षा वन बीएचकेच्या रूममधील जगणं लक्झरियस होतं, असं नाना पाटेकर म्हणाले होते.
टाकायचं कुठलं रे…
नाना पाटेकर मिळेल ते खायचे. अमूकच पदार्थ पाहिजे असा त्यांचा आग्रह नसायचा. विशेष म्हणजे ते ताटातील पदार्थ कधीच टाकायचे नाहीत. याबाबत त्यांना मराठी कोण होणार करोडपती शोमध्ये सचिन खेडेकर यांनी सवाल केला होता. त्यावर,टाकायचं कुठलं रे. तेवढी आपली पात्रताही नाही, असं नाना यांनी म्हटलं होतं.
पुरुषने खूप दिलं…
पुरुष नाटकात आपण अडकायला नको होतो, असंही त्यांनी याच कार्यक्रमात म्हटलं होतं. पुरुष नाटकाने मला खूप दिलं. मी या नाटकात इतका अडकलो नसतो तर बरं झालं असतं. 16 वर्ष मी सतत ते नाटक करत होतो. पैशाच्या लोभाने असेल. पाच वर्ष आधी ते नाटक सोडलं असतं तर अजून तीन चार नाटकं करता आली असती. पण ती नाही केली. पण पैसे खूप मिळायचे. मग घर घायचं असतं. मग अमूक करायचं. मग गाडी घ्यायची असते. मग एक नाही, दोन पाहिजे. आपण थांबत नाही. आपल्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे असतं, असं ते म्हणाले होते.