AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क चपलांचा मारा, घर गहाण ठेवलं, निर्मात्याला भांडी घासायला लावली; नानांचे हे किस्से माहीत आहे का?

नाना पाटेकर अत्यंत शिस्तबद्ध होते. निर्मात्याकडून भांडी घासून घेणे, एक कोटी रुपये फी घेणारे पहिले सहाय्यक अभिनेता असणे, 'अंकुश' चित्रपटासाठी स्वतःचे घर गहाण ठेवणे, आणि रंगमंचावर प्रेक्षकांच्या चपलांचा मार खाणे असे नानांचे अविश्वसनीय किस्से आहेत. एवढेच नव्हेतर सामाजिक कार्यात सर्वात पुढे असणारे नाना हा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे.

चक्क चपलांचा मारा, घर गहाण ठेवलं, निर्मात्याला भांडी घासायला लावली; नानांचे हे किस्से माहीत आहे का?
nana patekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 5:13 PM
Share

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या बाबतच्या असंख्य गोष्टी पुढे येत आहेत. नानांचे असंख्य किस्से समोर येत आहेत. नानांचा स्वभाव, नानांचं वाचन, फिटनेसची आवड, नानांचे लोकांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध, शेतीची आवड, गावाची आवड, गोरगरीबांच्या मदतीसाठी धावून जाणं अशा असंख्य गोष्टी समोर येत आहेत. नानांच्या संपर्कात आलेले लोक आणि त्यांचे मित्र आपल्या लाडक्या मित्राच्या या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यामुळे नानांचं व्यक्तिमत्त्व समोर येत आहे. नाना मिलिट्रीत राहिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे शिस्त होती. स्वावलंबीपण होतं. नानांच्या या स्वावलंबीपणाचा फटका एका बड्या निर्मात्यालाही बसला होता.

प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. विशेष म्हणजे तेव्हा नाना हयात होते. नाना पाटेकरला एका सिनेमात घेण्यासाठी एक निर्माता त्यांच्या घरी आला. त्यावेळी नानाने त्या निर्मात्याला मटण खातोस का म्हणून विचारलं. त्यानंतर नानाने मटण बनवलं. दोघांनीही मनमुरादपणे मटण खाल्लं. त्यानंतर नाना त्या निर्मात्याला म्हणाले, आता जेवण केलंस ना? जा जाऊन भांडी घास. नानाचे हे बोल ऐकून त्या निर्मात्याने चक्क भांडीही घासली, असं परेश रावल यांनी सांगितलं.

अन् एक कोटी रुपये मागितले

नाना पाटेकर म्हणजे बाप माणूस आहे. तो वेगळ्याच मातीचा बनलेला आहे, असंही परेश रावल म्हणाले. तसेच, नाना पाटेकर हिंदी सिनेमातील पहिला असा सहाय्यक अभिनेता होता ज्याने एका सिनेमासाठी 1 कोटी रुपये मागितले होते. विशेष म्हणजे निर्मात्याने त्याला एक कोटी रुपये दिलेही होते. त्याकाळात मोठमोठे हिरो सुद्धा एवढी फी मागायला घाबरायचे. तेव्हा नाना पाटेकरने चक्क एक कोटी रुपये घेतले. नाना पाटेकर हे अशा प्रकारचं वेगळंच रसायन होतं, असंही ते म्हणाले.

अंकुशसाठी घर गहाण टाकलं

नानांचा दुसरा एक किस्सा प्रसिद्ध आहे. 1986मध्ये आलेला अंकुश हा सिनेमा नाना पाटेकर यांच्या करिअरमधील महत्त्वाचा सिनेमा होता. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी नाना पाटेकर यांनी त्यांचं घर सुद्धा गहाण टाकलं होतं. दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी नाना पाटेकर यांना 10 हजार रुपये देऊन साईन केलं होतं. त्यातले 3 हजार रुपये नानांना अ‍ॅडव्हान्स देण्यात आले. बाकीचे 7 हजार रुपये सिनेमा प्रदर्शित झाल्यावर आणि बिजनेस झाल्यावर द्यायचे होते. या पैशातून नानाला स्कूटर खरेदी करायची होती.

पण सिनेमाची शुटिंग सुरू असतानाच निर्मात्याचे पैसे संपले. काम थांबलं. नानाला सिनेमाची कथा आणि मित्र असलेल्या एन. चंद्रावर विश्वास होता. त्यांनी आपलं घर गहाण ठेवलं. 2 लाख रुपये जमवले आणि निर्मात्याला दिले. त्यानंतर सिनेमा पूर्ण झाला. बॉक्स ऑफिसवर हिट झाला. नाना पाटेकर स्टार झाले. अंकुश हिट झाल्यानंतर नानाचं गहाण टाकलेलं घर सोडवून देण्यात एन. चंद्रा यांनी मदत केली. त्यांनी नानाला एक नवीन स्कूटरही गिफ्ट म्हणून दिली.

अन् बूट आणि चपलांचा मारा

नानांचा आणखी एक किस्सा प्रसिद्ध आहे. नाना पाटेकर यांनी पुरुष (1981) या नाटकात 16 वर्ष अभिनय केला. या नाटकाचे त्यांनी 1800 शो केले. या नाटकात त्यांनी खलनायक साकारला होता. हे कॅरेक्टर इतकं घृणास्पद होतं की, नाना पाटेकरांचा परफॉर्मन्स पाहून महिला संतापायच्या. नाटक सुरू असतानाच चपला, बुटं फेकून मारायच्या. जेव्हा त्या महिला स्टेजवर जाऊन चपला मागायच्या, तेव्हा मात्र नाना त्यांना चपला देण्यास नकार द्यायचे. त्या चपला सन्मान म्हणून ते सांभाळून ठेवायचे.

Follow Us
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात