Jhalak Dikhhla Jaa 10 | ‘झलक दिखला जा 10’च्या मंचावर रुबिना दिलैकने घेतला करण जोहरचा क्लास…

बिग बाॅसच्या घरामध्ये देखील रूबिनाने अशा काही हिंदी शब्दांचा प्रयोग केला होता, जे यापूर्वी कधी जास्त कोणी ऐकले नव्हते.

Jhalak Dikhhla Jaa 10 | झलक दिखला जा 10च्या मंचावर रुबिना दिलैकने घेतला करण जोहरचा क्लास...
| Updated on: Sep 24, 2022 | 11:30 AM

मुंबई : कलर्स टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘झलक दिखला जा’मध्ये कलाकारांचे जबरदस्त असे डान्स सध्या बघायला मिळत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमधील (TV industry) फेमस जोड्या या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. फैजल शेख, रुबिना दिलैक, शिल्पा शिंदे, पारस कलनावत, नीती टेलर यांसारखे सेलिब्रिटी आपल्या डान्सने (Dance) चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत.  नुकताच ‘झलक दिखला जा’चा एक प्रोमो प्रचंड व्हायरल होतो आहे.

झलक दिखला जा 10 चा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

‘झलक दिखला जा’च्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये सर्वांची आवडती लाडकी टीव्ही अभिनेत्री अर्थात रुबिना दिलैक दिसते आहे. प्रोमोमध्ये रुबिना दिलैक हिंदीची शिक्षिका झाल्याचे दिसते असून ती सर्वांना हिंदी शिकवते आहे. इतकेच नाही तर रुबिना हिंदी शब्दांचा अर्थ विचारते आहे. रुबिना दिलैक करण जोहर, रोहित शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांना बोर्डवर हिंदी शब्द लिहून त्यांचा अर्थ विचारत आहे.

रुबिना दिलैकने घेतला करण जोहरसह माधुरी दीक्षितचा क्लास

बिग बाॅसच्या घरामध्ये देखील रुबिनाने अशा काही हिंदी शब्दांचा प्रयोग केला होता, जे यापूर्वी कधी जास्त कोणी ऐकले नव्हते. त्यावेळी सलमान खानने ही रुबिनाचे काैतुक केले होते. हा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आणि लिहिले की, रुबिना दिलैक मंचावर जेंव्हा हिंदीची टिचर होते, तेंव्हा वातावरण…हा प्रोमो बघितल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की, झलक दिखला जा 10 मध्ये सर्वजण कशाप्रकारे मस्ती करत आहेत.