Nora Fatehi | मनातील खदखद व्यक्त करताना ‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीचे नाव आल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला होता.

Nora Fatehi | मनातील खदखद व्यक्त करताना नोरा फतेहीचा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे...
| Updated on: Nov 27, 2022 | 5:03 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नोरा फतेही चर्चेत आहे. नोराच्या डान्सवर अनेकजण फिदा आहेत. नोरा सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीचे नाव आल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला होता. इतकेच नाही तर सुकेशने नोराला काही गिफ्ट दिल्याचे देखील सांगितले जात आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराची चाैकशी देखील झाली आहे.

नोराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. नुकताच नोरा अजय देवगणच्या थॅक गाॅड या चित्रपटात दिसली होती, विशेष म्हणजे ती या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत देखील होती.

झलक दिखला जा 10 या शोमध्ये नोरा होस्ट आहे. हा शो अंतिम टप्प्यामध्ये पोहचला आहे. स्पर्धेक जबरदस्त असे डान्स करताना दिसत आहेत. नुकताच श्रीति झा हिने नोराच्या एका गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला.

नोरा फतेहीच्या बडा पछताओगे या गाण्यावर श्रीति झा आणि फैसल शेख यांनी जबरदस्त डान्स केला. मात्र, यादरम्यान नोरा अत्यंत भावूक झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर नोरा डान्स संपल्यानंतर रडायला देखील लागली.

यावर बोलताना नोरा म्हणाली की, ज्यावेळी या गाण्याची शूटिंग सुरू होते. त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये अशाच काही गोष्टी सुरू होत्या. मी देखील त्याच परिस्थितीमधून जात होते. माझ्या मनात तिच भावना होती.

ज्यावेळी बडा पछताओगे या गाण्याचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी नोरा फतेहीचे ब्रेकअप झाले होते. तिला प्रेमात धोका मिळाला होता. नोरा बोलताना म्हणाली की, हे गाणे माझ्यासाठी खास आहे.

यापूर्वीही नोराने प्रेमामध्ये आपल्याला धोका मिळाल्याचे सांगितले होते. परंतू नेमके कोणासोबत नोरा फतेहीचे ब्रेकअप झाले होते, याबाबत काही जास्त कळू शकले नाही. नोराला धोका दिलेल्या व्यक्तीचे नाव अजून नोराने सांगितले नाहीये.