मरता मरता वाचली… प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघतानंतर मोठं ऑपरेशन, रुग्णालयातला पहिला फोटो व्हायरल

अभिनेत्री नुसरत भरुचा बाली येथील अपघातातून थोडक्यात वाचली असून तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून तिचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ तिच्या जलद पुनर्प्राप्तीची कहाणी सांगतात. बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना हळूहळू बरे होत असल्याची सकारात्मक बातमी दिली आहे.

मरता मरता वाचली... प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघतानंतर मोठं ऑपरेशन, रुग्णालयातला पहिला फोटो व्हायरल
Nushrratt Bharuccha
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 11:32 PM

अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या जीवावरचं संकट टळलं आहे. नुसरत एक अपघातातून मरता मरता वाचली. सुट्टी घालवण्यासाठी नुसरत बालीला गेली होती. तिथे एक अपघात झाला. त्यामुळे तिच्या पाठिच्या कण्याला प्रचंड मोठी दुखावत झाली. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला एअर अॅम्ब्युलन्सने भारतात आणलं. भारतात आल्यावर तिच्या पाठिच्या कण्याची सर्जरी करण्यात आली आहे. आता तिची प्रकृती ठणठणीत असून तिचे रुग्णालयातील फोटोही व्हायरल झाले आहेत.

नुसरत भरुचाने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिला तिची नर्स जेवण भरवताना दिसत आहे. नुसरत टीव्ही पाहत आहे. टीव्हीर शाहरुख आणि काजोलचं ‘रंग दे तू मुझे गेरुआ’ हे गाणं सुरू आहे. हे गाणं 2015मध्ये प्रदर्शित झालेल्या दिलवाले या सिनेमातील आहे. अरिजीत सिंह आणि अंतरा मित्र यांनी हे गाणं गायलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहिलं होतं.

Loading...

पोस्टमध्ये काय म्हटलं?

नुसरतने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. आणि शाहरुख आणि काजोलने चेहऱ्यावर हास्य उमटवलं. सर्व काही ठिक होईल याची आशा आहे. हळूहळू. नेहमीच होतं. हळूहळू ठिक होत आहे आणि स्वप्ने पाहत आहे, असं तिने म्हटलं आहे. या आधी तिने व्हीलचेअरचा फोटो शेअर केला होता. व्हीलचेअर खुर्चीजवळ होती आणि खिडकीतून सूर्य मावळताना दिसत होता. त्यावर तिने कॅप्शन दिलं होतं. मला सूर्यास्त नेहमी आवडतो. आता अचानक आमचं दृश्य असं बदलून गेलंय. पण पिक्चर अजून बाकीय, असं तिने म्हटलं होतं.

कोणत्या सिनेमात दिसली?

नुसरतने 2006 मध्ये आलेल्या ‘जय संतोषी मां’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. प्यार का ‘पंचनामा या सिनेमामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘जनहित में जारी’, ‘सेल्फी’, ‘तू झूठी मैं मक्कार’ (कॅमियो), ‘अकेली’, ‘ड्रीम गर्ल’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’, ‘हुड़दंग’ आदी सिनेमात तिने काम केलं. 2025मध्ये तिला ‘छोरी 2’ आणि ‘उफ्फ ये सियापा’ आदी सिनेमे केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us