AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना धो धो, ना मुसळधार… मुंबई, ठाणे, रायगडकरांनो घराबाहेर निघताना सावध, उद्याही निघणार घामटा; अलर्ट जारी

राज्यात पावसाळ्याची अखेर झाली असली तरी, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरीत उष्णतेची लाट आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागरिकांना उष्ण आणि दमट हवामानामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, तसेच काही ठिकाणी खराब हवेमुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ना धो धो, ना मुसळधार... मुंबई, ठाणे, रायगडकरांनो घराबाहेर निघताना सावध, उद्याही निघणार घामटा; अलर्ट जारी
heatwave alert for Mumbai, Thane and PalgharImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 10:56 PM
Share

राज्यातून पाऊस गेला असल्याचं हवामान खात्याने आधीच जाहीर केलं आहे. पण तरीही हवामान खात्याचे अंदाज येत आहेत. आता हे अंदाज पावसाचे नसून उष्णतेच्या लाटेचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अनेकजण होरपळून निघाले आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरीतही परिस्थिती काही वेगळी नाही. या चारही शहरात उष्णतेची लाट आहे. उद्याही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत उष्णता कायम राहणार आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील नागरिकांचा घामटा निघणार असून जपून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत आज 38.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील तापमान 36.5 अंश सेल्सिअसवर होतं. उद्या देखील मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात उष्णतेने कहर केला आहे. दोन दिवसांपूर्वी उष्णतेची लाट धडकल्यानंतर रविवारी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. सांताक्रुझ येथील हवामान केंद्रावर 38 अंश कमाल तापमानाची नोंद झाली, तर ठाण्याचा पाराही 37.2 अंशांवर झेपावला. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

रविवार तापदायक, उद्याही ताप

मुंबई शहर आणि उपनगरांसह संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी रविवारचा दिवस तापदायक ठरला. सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबियांसोबत घराबाहेर पडलेल्या नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. रविवारी शहराच्या अनेक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहिल्याने नागरिकांची दमछाक झाली होती. तापमानाने सायंकाळपर्यंत 38 अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. शुक्रवारी शहरात उष्णतेची लाट धडकली होती. त्यावेळी पारा 38 अंशांच्या घरात गेला होता. त्याच उष्णतेची पुनरावृत्ती रविवारीही दिसून आली. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासह पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

श्वास घेण्यास त्रास होणार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 101 इतका नोंदवण्यात आला. हा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत मोडत असून या श्रेणीतील हवेच्या गुणवत्तेमुळे आजारी लोक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तापमानवाढीबरोबरच हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक निर्देशांक

मुंबईतील विविध निरीक्षण केंद्रांपैकी वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक 424 इतका एक्यूआय नोंदवला गेला. त्यापाठोपाठ देवनार (137) आणि माझगाव (115) यांचा क्रमांक लागला. तसेच बोरिवलीमध्ये 79, मालाड-95, घाटकोपर-67, कुलाबा- 75 आणि भायखळयात 73 इतक्या एक्यूआयची नोंद करण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे येथे 74, नवी मुंबईत 80 आणि कल्याणमध्ये 82 इतका एक्यूआय नोंदवला गेला.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान