AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निष्ठावंतांनी दगा दिला, दादानंतरची पहिलीच निवडणूक; सुनेत्रा पवारांनी बाजीच पलटली; वाचा इन्साइड स्टोरी

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांनी मिळवलेला विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील हे पहिलेच मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. निष्ठावंतांनी दगा देऊनही, सभासदांनी दादांच्या वारशावर विश्वास दाखवत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला शिक्कामोर्तब केले. हा विजय बारामतीमधील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

निष्ठावंतांनी दगा दिला, दादानंतरची पहिलीच निवडणूक; सुनेत्रा पवारांनी बाजीच पलटली; वाचा इन्साइड स्टोरी
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 10:29 PM
Share

विक्रम वरे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या पश्चात सहकारातील नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची क्षमता सिद्ध केली आहे. ही निवडणूक केवळ कारखान्याच्या सत्तेसाठी नव्हती, तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशावर आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. या निकालातून सुनेत्रा पवारांनी आपले पहिले मोठे राजकीय आव्हान यशस्वीपणे परतवून लावले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार यांचा 1992 पासून प्रभाव राहिला आहे. त्यांचे निष्ठावंत सहकारी आणि विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पॅनल उभे केल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. अजितदादांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रात झालेली ही पहिली मोठी निवडणूक असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासमोर नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान होते. मात्र,सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत प्रचाराची धुरा सांभाळली. जय पवार यांच्या साथीने त्यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावांत जाऊन सभासदांशी संवाद साधला. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कारखान्याच्या विकासाला गती देण्याचा विश्वास त्यांनी सभासदांना दिला. त्याचबरोबर अजितदादांबद्दलची सहानुभूती आणि त्यांच्या नेतृत्वावरील निष्ठा या बाबीही निवडणुकीत महत्त्वाच्या ठरल्या.

निष्ठेला प्राधान्य

अजित पवार यांच्या निधनाला आठ महिनेही पूर्ण झाले नसताना त्यांच्या दीर्घकालीन सहकाऱ्याने वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने सभासदांमध्ये त्याची चर्चा झाली. पुरुषोत्तम जगताप यांचा कारखान्यातील अनुभव आणि यापूर्वीचा कारभार हे त्यांच्या बाजूचे मुद्दे असतानाही, सभासदांनी निष्ठेला प्राधान्य दिल्याचे निकालातून दिसून आले. तर शरद पवार गटाच्या पॅनेलचे नेतृत्व करत असलेले युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचा ही पराभव झाला आहे. अजितदादांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास कायम असल्याचे दाखवत सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळवून दिले.

निकालातून उत्तर

सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना या निकालाने उत्तर मिळाले असून, अजितदादांच्या पश्चात पक्ष आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची जबाबदारी त्या समर्थपणे पेलू शकतात, असा संदेश या विजयातून गेला आहे. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधामुळे उमेदवारीबाबत चर्चा झालेल्या काही संचालक उमेदवारांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

सोमेश्वर कारखान्याच्या या निकालाने केवळ सत्तेचे समीकरण बदलले नाही, तर आगामी काळातील बारामतीच्या सहकार आणि राजकारणाची दिशाही स्पष्ट केली आहे. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला मिळालेली ही पहिली मोठी चाचणी यशस्वी ठरल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी हा विजय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान