परिणीती चोप्राच्या ‘कोड नेम तिरंगा’ चित्रपटाचे ट्रेलर अखेर रिलीज, पाहा व्हिडीओ…

नुकताच परिणीतीच्या कोड नेम तिरंगा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. कोड नेम तिरंगा चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

परिणीती चोप्राच्या कोड नेम तिरंगा चित्रपटाचे ट्रेलर अखेर रिलीज, पाहा व्हिडीओ...
| Updated on: Sep 29, 2022 | 7:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू स्टारर ‘कोड नेम तिरंगा’ (Code Name Tiranga) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. सुरूवातीपासूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, आलिया भट्टचा राझी आणि परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) तिरंगा चित्रपट एकसारखेच आहेत. मात्र, यावर स्वत: परिणीतीने स्पष्टीकरण दिले असून तिने सांगितले की, राजीचा सेटअप आणि स्टोरी आणि माझ्या तिरंगा चित्रपटाची स्टोरी सर्व काही वेगळे आहे. नुकताच परिणीतीच्या कोड नेम तिरंगा या चित्रपटाचे ट्रेलर (Trailer) रिलीज झाले आहे.

कोड नेम तिरंगा चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या ट्रेलरमध्ये परिणीती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. अ‍ॅक्शन पॅक ट्रेलरमध्ये परिणीतीचा एक वेगळा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटामध्ये परिणीतीचे नाव दुर्गा सिंह आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सुरूवातीला शरद केळकर दिसतोय.

तिरंगा चित्रपटात परिणीती जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. अभिनेता शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा आणि रजित कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

देशावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून अधिक प्रेम मिळते. आता बाॅक्स आॅफिसवर परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांचा कोड नेम तिरंगा हा चित्रपट काय कमाल करतो हे बघण्यासारखे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरचा चित्रपट सोडला तर आमिर खान आणि अक्षय कुमार यांचे देखील चित्रपट काही खास कमाल करू शकले नाहीत.