Ranveer Singh: “आमच्या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करणार का?”, PETA चं रणवीर सिंगला पत्र

पेटाने रणवीर सिंगला पत्र लिहून न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे. PETA ने रणवीरला विचारलं आहे की तो त्यांच्या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करू शकतो का?

Ranveer Singh: आमच्या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करणार का?, PETA चं रणवीर सिंगला पत्र
Ranveer SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 10:27 AM

काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोंमुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला. एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी त्याने केलेल्या या फोटोशूटवरून (Nude Photoshoot) मोठा वाद झाला होता. एकीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी त्याचं कौतुक केलं, तर अनेकांनी त्याच्या या फोटोशूटवर जोरदार टीका केली. या सर्व वादानंतर आता ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ने (पेटा, PETA) रणवीर सिंगला पत्र लिहून त्यांच्यासाठी पुन्हा एकाद न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे.

‘पेटा’ने रणवीर सिंगला लिहिलं पत्र

पेटाने रणवीर सिंगला पत्र लिहून न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे. PETA ने रणवीरला विचारलं आहे की तो त्यांच्या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करू शकतो का? प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या या संस्थेसाठी रणवीरने फोटोशूट करून त्यांच्या मोहिमेद्वारे शाकाहारी खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याचा संदेश द्यावा अशी अपेक्षा आहे. या एनजीओने त्याला विचारलं की तुम्ही पेटा इंडियासाठी न्यूड फोटोशूट करू शकता का? या पत्रात त्यांनी पामेला अँडरसनचंही उदाहरण दिलं आहे. पामेलाने पेटासाठी तसं फोटोशूट केलं होतं.

हे सुद्धा वाचा

‘पेटा’चं पत्र

रणवीरविरोधात गुन्हा

न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिसांनी रणवीरविरोधात गुन्हा दाखल केला होता. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेचे ललित टेकचंदानी यांनी या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम 292, 293, 509 अंतर्गत गुन्हा नोंदवला. भारताला चांगली संस्कृती लाभली असून, या फोटोशूटमुळे महिलांसह सर्वांच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

इंडस्ट्रीतील आमिर खान, आलिया भट्ट, विद्या बालन, अर्जुन कपूर यांसारख्या अनेक कलाकारांनी रणवीरच्या या वादग्रस्त फोटोशूटचं कौतुक केलं आहे. रणवीर लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्येही तो मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिसदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.