Phone Bhoot: कतरिनाच्या ‘फोन भूत’मध्ये हॉररसोबत कॉमेडीचा तडका; ट्रेलरवर कमेंट्सचा वर्षाव

कतरिनाचा 'फोन भूत' कार्तिक आर्यनच्या 'भुलभुलैय्या 2'ला देणार टक्कर?

Phone Bhoot: कतरिनाच्या फोन भूतमध्ये हॉररसोबत कॉमेडीचा तडका; ट्रेलरवर कमेंट्सचा वर्षाव
Phone Bhoot trailer
Image Credit source: Youtube
| Updated on: Oct 10, 2022 | 3:46 PM

मुंबई- कतरिना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फोन भूत’ (Phone Bhoot) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच  प्रदर्शित झाला आहे. जवळपास अडीच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या हॉरर कॉमेडी (Horror Comedy) चित्रपटात कतरिना अनोख्या अंदाजात पहायला मिळणार आहे. कारण तिने ग्लॅमरस अंदाजातील भूताची भूमिका साकारली आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ यांचीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

इशान आणि सिद्धांत या दोघांनाच फक्त भूत दिसत असतात. ही गोष्ट जेव्हा दोघांना कळते, तेव्हा ते त्यातून पैसे कमावण्याचा मार्ग शोधतात. भूतांना पकडण्याच्या व्यवसायात त्यांना कतरिना कैफ भेटते. कतरिना या दोघांना हटके बिझनेसची कल्पना देते. तिच्यामुळे या दोघांना भूतांच्या व्यवसायातून चांगलाच पैसा मिळतो. मात्र कतरिनाचा त्यामागचा उद्देश वेगळा असतो. कतरिनाचा उद्देश ते दोघं पूर्ण करू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

पहा ट्रेलर-

गुरमीत सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ट्रेलरमध्ये भूतांची बरीच भयानक दृश्ये पहायला मिळतात. मात्र तितकाच कॉमेडी असलेला हा ट्रेलर चेहऱ्यावर हास्य नक्कीच आणतो. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘स्त्री’, ‘भुलभुलैय्या 2’ यांसारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांच्या यादीत बसणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या 2’ला ‘फोन भूत’ जबरदस्त टक्कर देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या चित्रपटाला अवघ्या काही तासांत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 90 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.