AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत… विशाल – रुचिताचं रिलेशनशिप, कुटुंबियांची अशी प्रतिक्रिया

'बिग बॉस मराठी 6' च्या घरातील विशाल - रुचिता यांतं रिलेशनशिप, कुटुंबियांची प्रतिक्रिया, 'लेक पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत...', ढसाढसा रडलेले वडील, सध्या सर्वत्र रुचिता हिची चर्चा...

लेक पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत... विशाल - रुचिताचं रिलेशनशिप, कुटुंबियांची अशी प्रतिक्रिया
| Updated on: Mar 12, 2026 | 10:58 AM
Share

आभिनेता रितेश देशमुख याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी 6’ दिवसागणिक अधिक रंगत आहे. आता तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाल्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात नवीन ट्विस्ट आला आहे. तर रुचिता जामदार हिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. सांगायचं झालं तर, घरात असताना टोळी सोडली तर, कोणत्याच स्पर्धकासोबत रुचिता हिचं जमलं नाही… सतत सर्वांसोबत वाद.. शिवराळ भाषा आणि अपमान… या गोष्टींमुळे कायम रुचिता हिला ट्रोल करण्यात आलं. अनेकदा भाऊच्या धक्क्यावर देखील अनेकदा रितेश याने रुचिता हिला सुनावलं.. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील रुचिता हिला बाहेर काढा… अशी मागणी होत होती. अखेर रुचिता हिला घरातून बाहेर काढण्यात आलं…

घरात रुचिता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असायची… एवढंच नाही तर, विशाल याच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे रुचिता अधिक चर्चेत राहिली… विशाल याच्यामुळे तुझा गेम दिसतच नाही.. असं देखील अनेकांनी रुचिताला सांगितलं… पण तरी देखील रुचिता कायम विशाल याच्यासोबत उभी राहायची. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी फक्त घरातच नाही तर, घराबाहेर देखील मोठा जोर धरला आणि याची किंमत रुचिता हिच्या कुटुंबियांना मोजावी लागली.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रुचिता हिने यावर मोठा खुलासा केला. ‘विशाल माझ्या बाजूने उभा होता, म्हणून आमची मैत्री घट्ट झालेली. आमच्यात प्रेम आणि चुकीचं असं काहीही नव्हत. पण रंगलेल्या चर्चांचा सर्वात जास्त त्रास माझ्या कुटुंबियांना झाला…’

‘लोक माझ्या पप्पांना जाऊन सांगायचे, तुमची लेक पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करत आहे… हे ऐकून माझ्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली… माझे पप्पा कधीच रडले नव्हते, पण त्या दिवशी ते खूप रडले… जर मी चुकीची असेल तर मला बोला… माझ्या कुटुंबाला का त्रास देता? टीव्हीवर जे दिसतं ते 100 टक्के खरं असतं असं नाही…’, असं देखील रुचिता म्हणाली.

आता टोळातील एक एक सदस्या बाहेर आले आहेत आणि विशाल एकटाच राहिला आहे. अशात राखी आणि विशाल यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे… आता बिग बॉसमध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?