पोन्नियिन सेल्वनने केली ‘विक्रम वेधा’वर मात, वाचा पहिल्या दिवशीचे कलेक्शन…

पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने पहिल्याच दिवशी बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. ओपनिंग डेची पोन्नियिन सेल्वनची कमाई चांगली राहिली असून आता निर्मात्यांना चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पोन्नियिन सेल्वनने केली विक्रम वेधावर मात, वाचा पहिल्या दिवशीचे कलेक्शन...
| Updated on: Oct 01, 2022 | 11:06 AM

मुंबई : पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) आणि विक्रम वेधा हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. बाॅक्स आॅफिसवर नेमका कोणता चित्रपट धमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 30 सप्टेंबर रोजी म्हणजेच काल पोन्नियिन सेल्वन आणि विक्रम वेधा चित्रपट (Movie) रिलीज झालेत. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या दिवशीच पोन्नियिन सेल्वनला मोठा धक्का बसला होता. कॅनडामध्ये तामिळ व्हर्जनमध्ये पोन्नियिन सेल्वन रिलीज (Release) होणार नसल्याचे लास्ट वेळी प्रेक्षकांना सांगण्यात आले.

इथे पाहा PS1 चित्रपटाची कमाई

पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने पहिल्याच दिवशी बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. ओपनिंग डेची पोन्नियिन सेल्वनची कमाई चांगली राहिली असून आता निर्मात्यांना चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ओपनिंग डेला आॅफिस कलेक्शनमध्ये पोन्नियिन सेल्वनने विक्रम वेधा या चित्रपटाला मागे टाकले आहे आणि दणक्यात सुरूवात केलीये.

पोन्नियिन सेल्वनने पहिल्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये सुमारे 40 कोटींचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. चित्रपटाची सुरूवात चांगली झालीये. तामिळ व्हर्जनमध्ये चित्रपटाने तब्बल 27 कोटींची कमाई केली असून हिंदी व्हर्जनमध्ये 2 कोटींची कमाई केली आहे.

इथे पाहा विक्रम वेधा चित्रपटाची कमाई

हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा चित्रपट विक्रम वेधानेही चांगली सुरूवात केलीये. मात्र, जेवढी या चित्रपटाची चर्चा होती, त्या तुलनेत चित्रपट काही खास कमाल पहिल्या दिवशी करू शकला नाहीये. विक्रम वेधाने पहिल्या दिवशी पोन्नियिन सेल्वनपेक्षा कमी कमाई केलीये. ‘विक्रम वेधा’ने भारतात पहिल्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे.