पूनम पांडेनं निधनाच्या 2 दिवसआधी शेअर केला व्हिडीओ; पाहून विश्वासच नाही बसणार

| Updated on: Feb 02, 2024 | 1:07 PM

Poonam Pandey Passes Away Last Instagram Post Before Death : अभिनेत्री पूनम पांडेचं निधन... वयाच्या केवळ 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. निधनाच्या केवळ दोन दिवसआधी शेअर केलेला पूनम पांडे हिने एक व्हीडिओ शेअर केला होता. तो पाहून विश्वासच बसणार नाही.

पूनम पांडेनं निधनाच्या 2 दिवसआधी शेअर केला व्हिडीओ; पाहून विश्वासच नाही बसणार
Follow us on

मुंबई | 02 जानेवारी 2024 : अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. पूनमच्या मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यावरून पूनमच्या निधनाची बातमी समोर आली आहे. पण निधनाच्या दोन दिवस आधी तिने एक व्हीडिओ शेअर केला होता. White & black: the yin and yang that balance my life, असं म्हणत पूनम पांडे हिने एक व्हीडिओ शेअर केला होता.

पूनमने शेअर केलेला व्हीडिओ

काल रात्री पूनमचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पण निधनाच्या केवळ दोन दिवस आधी म्हणजेच 29 जानेवारीला पूनमने एक पोस्ट शेअर केली होती. ब्लँक अँड व्हाईट आऊटफिटमधला एक व्हीडिओ पूनमने शेअर केलाय. ब्लँक अँड व्हाईट कलर माझं जीवन बॅलन्स करतात, असं पूनमने या पोस्टमध्ये म्हटलंय. हा व्हीडिओ गोव्यातला असल्याची माहिती आहे.

पूनमच्या मॅनेजिंग टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्वाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे, अशी पोस्ट पूनमच्या टीमकडून शेअर करण्यात आली आहे.

पूनम पांडेचं निधन

अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झालंय. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सरमुळे तिचं निधन झालं आहे. काल (गुरुवारी) रात्री तिचं निधन झाल्याची माहिती आहे.

चाहत्यांना विश्वास बसेना

पूनमच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर तिच्या फॅन्सच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. विश्वासच बसत नाही. काल परवापर्यंत ती व्यवस्थित होती. ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत होती. पण मग अचानकपणे अशी बातमी आल्याने चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. ही बातमी खोटी ठरो, अशी कमेंट्स पूनमच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.