वाढदिवसाच्या दिवशी थेट जुहू येथे उद्घाटनासाठी पोहोचला रोहित शेट्टी, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

रोहित शेट्टी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रोहित शेट्टी याचा आज वाढदिवस असून चाहते रोहित शेट्टी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता वाढदिवसानिमित्त एका खास कार्यक्रमात रोहित शेट्टी हा पोहोचला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी थेट जुहू येथे उद्घाटनासाठी पोहोचला रोहित शेट्टी, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...
| Updated on: Mar 14, 2023 | 6:57 PM

मुंबई : बाॅलिवूड चित्रपटांचा डायरेक्टर रोहित शेट्टी (Rohit Shetty) याचा आज 49 वा वाढदिवस आहे. आज सकाळपासूनच रोहित शेट्टी याला चाहते मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) हा मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे रोहित शेट्टी याच्यासह चित्रपटाची संपूर्ण टिम चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. शक्यतो रोहित शेट्टी याचे चित्रपट फ्लाॅप जात नाहीत. मात्र, याला सर्कस हा चित्रपट (Movie) अपवाद ठरला आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. हा रोहित शेट्टी याच्यासाठी मोठा झटका नक्कीच आहे.

रोहित शेट्टी याने वाढदिवसाच्या दिवशी मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले. यावेळी रोहित शेट्टी हा मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह दिसला. आता या उद्घाटन समारंभातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. रोहित शेट्टी याला वाढदिवसाच्या दिवशी पोलीस ठाण्याचे उद्घाटन करताना पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

रोहित शेट्टी याच्या फोटोवर आणि व्हिडीओवर कमेंट करत चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनेकांनी रोहित शेट्टी याचे काैतुकही केले. वाढदिवसाच्या दिवशी रोहित शेट्टी हा एखाद्या मोठ्या चित्रपटाची घोषणा करेल, असा अंदाजा होता. मात्र, रोहित शेट्टी पोलिसांच्या मुंबईमधील कार्यक्रमामध्ये थेट पोहचलेले दिसला.

रोहित शेट्टी हा कायमच पोलिसांशी संबंधित कार्यक्रमांना हजेरी लावतो. इतकेच नाही तर रोहित शेट्टी याने त्याच्या करिअरमध्ये पोलिसांशी संबंधित अनेक चित्रपट तयार केले आहेत. दिवाळी 2024 मध्ये रोहित शेट्टी याचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परत एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांचा धमाका प्रेक्षकांना बघायला मिळेल.

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह यांनी सर्कस चित्रपटाचे प्रमोशन केले. विशेष म्हणजे सर्कस हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर याबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत होती. परंतू प्रत्यक्षात चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह याचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. या चित्रपटामधील रणवीर सिंह याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला नाही.