Salman Khan | ‘सलमान खान’ची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण

| Updated on: Nov 22, 2022 | 8:31 PM

अरबाज खानचा मुलगा अरहान खान हा देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.

Salman Khan | सलमान खानची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
Salman Khan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांचा भेटीला येतोय. सलमान खान, अरबाज खान हे बाॅलिवूडमध्ये दणदणीत काम करत असतानाच यांची नवीन पिढी देखील बाॅलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. इतकेच नव्हे तर सलमान खानचा पुतण्या अर्थात अरबाज खानचा मुलगा अरहान खान हा देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.

चित्रपट निर्माता अतुल अग्निहोत्री आणि अलविरा अग्निहोत्री यांची मुलगी आणि सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री आहे. विशेष म्हणजे अलिजेह राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्याच्या चित्रपटात दिसणार असल्याने तिचे नशीब चमकणार असल्याचा अंदाजा लावला जातोय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन अलिजेह अग्निहोत्री करणार असून त्यांनी त्यांच्या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. अलिजेहचा हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अलिजेह अग्निहोत्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलिजेह चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच चाहत्यांसोबत एक खास नाते अलिजेह हिने निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे अलिजेह ही सध्या अभिनय आणि नृत्य यांचे धडे देखील घेत आहे. अलिजेह ही मोठ्या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणार आहे. सलमान खान देखील अलिजेह हिला बाॅलिवूड पदार्पणासाठी मदत करत असल्याचे सांगितले जात आहे.