
Shah Rukh Khan Special connection with Pakistan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील किंग खानच्या चाहत्यांचीसंख्या फार मोठी आहे. किंग खान याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. एका मुलाखतीत शाहरुख याने त्याच्या पकिस्तान कनेक्शनबद्दल सांगितलं होतं.
एका मुलाखतीत शाहरुख खान याने पाकिस्तानला चांगला शेजारी आणि त्याचं कुटुंब पाकिस्तानातील असल्याचं सांगितलं होतं. अभिनेत्याची जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. मुलाखतीत किंग खान म्हणाला होता, ‘दोन्ही बाजूंचे स्वतःचे काही विचार आहेत. माझं कुटुंब पाकिस्तानातील आहे.
माझ्या वडिलांचा जन्म पाकिस्तान येथे झाला होता. पाकिस्तान चांगला शेजारी देश आहे. आपण चांगले शेजारी आहोत… आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.’
शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांचे वडील मीर ताज मोहम्मद दिल्लीला आले. शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद यांचा जन्म फाळणीपूर्वी पेशावरमध्ये झाला होता.
शाहरुख खानचे काका गुलाम मोहम्मद गामा हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि ते पाकिस्तानातच राहिले. त्याच्या काकांचे कुटुंब पेशावरमध्ये राहत आहे. शाहरुख खान याचं कुटुंब देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.
शाहरुख खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘डंकी’ सिनेमात दिसला होता. किंग खानचा पठाण आणि जवान हा सिनेमा देखील 2023 मध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्याच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता शाहरुख ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.